ख्रिस्ती जीवन
चांगली उत्तरं कशी द्यावी
चांगल्या उत्तरांमुळे मंडळीला उभारणी मिळते. (रोम १४:१९) उत्तर देणाऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. (नीति १५:२३, २८) त्यामुळे आपण प्रत्येक सभेत एकतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण प्रत्येक वेळी हात वर केल्यावर आपल्याला उत्तर द्यायची संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे आपण एक-दोन नाही तर जास्त उत्तरं तयार केली पाहिजेत.
चांगलं उत्तर . . .
सोपं, स्पष्ट आणि संक्षिप्त असतं. बऱ्याचदा ते ३० सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात देता येतं
स्वतःच्या शब्दात दिलं जातं
देताना आधीच्या उत्तरातील मुद्दे पुन्हा सांगायचे नसतात
जर तुम्हाला उत्तर द्यायची पहिली संधी मिळाली तर . . .
सरळ, सोपं आणि प्रश्नाचं थेट उत्तर द्या
प्रश्नाचं थेट उत्तर आल्यावर, तुम्ही . . .
परिच्छेदातील एखादं शास्त्रवचन मुद्द्याशी कसं निगडित आहे त्यावर टिप्पणी करू शकता
तो विषय आपल्या जीवनाशी कसा संबंधित आहे ते सांगू शकता
दिलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो ते सांगू शकता
दिलेल्या माहितीशी निगडित असलेला एखादा अनुभव थोडक्यात सांगू शकता