वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ५
  • ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • मध—मधमाशीकडून मानवाला भेट
    सावध राहा!—२००५
  • मध सुमधूर औषध
    सावध राहा!—२००२
  • ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे १२-१६

ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे

छापील आवृत्ती
तराजूमध्ये सोन्याच्या नाण्यांपेक्षा गुंडाळीचं वजन जास्त आहे

देवाकडून मिळणारं मार्गदर्शन एवढं मौल्यवान का आहे? कारण त्यामुळे लोकांना वाईट मार्गापासून फिरण्यासाठी मदत होते आणि त्यांचा जीव वाचतो. ज्ञान मिळाल्यामुळे त्यांच्या विचारांवर, बोलीवर, आणि कार्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

ज्ञानप्राप्तीमुळे आपण गर्वापासून लांब राहतो

१६:१८,१९

  • एक गर्विष्ठ व्यक्‍ती

    सर्व प्रकारचं ज्ञान यहोवाकडून येतं या गोष्टीची जाणीव सुज्ञ व्यक्‍तीला असते

  • जे जीवनात यशस्वी आहेत किंवा ज्यांना जास्त जबाबदाऱ्‍या दिल्या जातात, खासकरून त्यांनी गर्व आणि अहंकार यांपासून सावध राहिलं पाहिजे

ज्ञानप्राप्तीमुळे आपली बोली प्रोत्साहनदायक होते

१६:२१-२४

  • एक व्यक्‍ती बोलते आणि दुसरी ऐकते

    एक सुज्ञ व्यक्‍ती समजबुद्धीचा वापर करून इतरांमध्ये असलेले चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोलते

  • सुज्ञ व्यक्‍तीचे शब्द कठोर किंवा दुखवणारे नसतात, तर ते मधासारखे गोड आणि प्रोत्साहन देणारे असतात

तुम्हाला माहीत होतं का?

मधाचं पोळं

मध खाल्ल्यावर आपलं शरीर त्यातील घटक लगेच शोषून घेतं आणि त्याचं रूपांतर उर्जेत करतं. मध गोडव्यासाठी आणि औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे.

ज्या प्रकारे मध शरीरासाठी चांगलं आहे त्या प्रकारे प्रोत्साहनदायक शब्दांमुळे आध्यात्मिक तजेला मिळतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा