वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 सप्टेंबर पृ. २
  • प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?
    सावध राहा!—२०२४
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 सप्टेंबर पृ. २

ख्रिस्ती जीवन

प्रचार करताना लहान मुलाने दार उघडलं तर

दोन बहीणी एका आई आणि मुलीला प्रचार करताना

प्रचार करताना जर लहान मुलाने दार उघडलं, तर आपल्याला त्याच्या आईवडिलांशी बोलायचं आहे असं आपण त्याला सांगू शकतो. असं केल्याने आपण त्याच्या पालकांच्या मस्तकपदाला आदर दाखवतो. (नीति ६:२०) मुलाने जर आपल्याला घरात बोलवलं तर आपण आत जाऊ नये. जर त्याचे आईवडील घरी नसतील तर आपण इतर वेळी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू शकतो.

मुलगा जरी मोठा असला, म्हणजे १५ ते १९ या वयोगटातील असला, तरीसुद्धा आपण त्याच्या आईवडिलांशी बोललं पाहिजे. जर ते घरात नसतील तर आपण मुलाला विचारू शकतो “तुला तुझे आईबाबा तुझ्या आवडीची पुस्तकं, मासिकं वाचू देतात का?” जर त्याने “हो” म्हटलं तर तुम्ही त्याला वाचण्यासाठी साहित्य देऊ शकता आणि jw.org या आपल्या वेबसाईटला भेट द्यायला सांगू शकता.

एका किशोरवयीन मुलाने आवड दाखवली तर पुनर्भेटीत आपण त्याच्या पालकांना भेटलं पाहिजे. यामुळे आपल्या येण्याचा काय उद्देश होता आणि कुटुंबांसाठी बायबलमध्ये कोणता भरवशालायक सल्ला दिला आहे, हे आपण त्यांना दाखवू शकतो. (स्तो ११९:८६, १३८) आपण पालकांना आदर दाखवल्याने त्यांना चांगली साक्ष मिळते आणि त्यामुळे कदाचित आपल्याला त्या कुटुंबाला सुवार्ता सांगण्याच्या आणखी संधी मिळू शकतील.—१पेत्र २:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा