देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब २८-३२
एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत ईयोबाने उत्तम उदाहरण मांडलं
ईयोबाने यहोवाच्या नैतिक दर्जांचं पालन करण्याचा ठाम निश्चय केला होता
त्याने आपल्या डोळ्यांवर ताबा ठेवला आणि आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार केला नाही
ईयोबाने इतरांशी वागण्याच्या बाबतीतदेखील उत्तम उदाहरण मांडलं
तो नम्र, न्यायी व दयाळू होता. समाजात लोकांचं कोणतंही स्थान असलं, म्हणजे ते गरीब असोत अथवा श्रीमंत, तरी त्याने सर्वांची कदर केली
ईयोब उदार होता
तो गरजूंना मदत करायचा