सल्ला देणाऱ्याच्या शब्दांनी इतरांचं धैर्य वाढलं पाहिजे
१६:४, ५
ईयोब खूप दुःखी व निराश झाला होता. त्यामुळे त्याला इतरांकडून मानसिक आधाराची व उत्तेजनाची गरज होती
ईयोबाच्या तीन मित्रांनी त्याच्या दुखऱ्या मनावर फुंकर तर घातलीच नाही, उलट त्याच्यावर आरोप लावून त्याच्या मनावर झालेल्या जखमांवर मीठ चोळलं
बिल्ददच्या खोचक शब्दांमुळे ईयोबाला खूप दुःख झालं
१९:२, २५
आपल्या कष्टांपासून सुटका करण्यासाठी, म्हणजे अगदी मरण आलं तरी चालेल अशी ईयोबाने देवाकडे विनंती केली
ईयोबाचे लक्ष पुनरुत्थानाच्या आशेवर होतं म्हणून तो विश्वासूपणे त्याच्यावर आलेल्या परीक्षा सहन करत राहिला