वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. २
  • पाहुण्यांचं स्वागत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाहुण्यांचं स्वागत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांचे स्वागत करा!
    आमची राज्य सेवा—२०१३
  • एक जबरदस्त साक्ष दिली जाईल
    आमची राज्य सेवा—२०११
  • स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍यांना आपण मदत कशी करू शकतो?
    आमची राज्य सेवा—२००८
  • स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. २

ख्रिस्ती जीवन

पाहुण्यांचं स्वागत करा

या वर्षी २३ मार्च रोजी, १ कोटीपेक्षा जास्त लोक स्मारकविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वक्‍ता आपल्या भाषणात, यहोवानं दिलेल्या खंडणीच्या भेटीबद्दल आणि त्यामुळं भविष्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल सांगेल, तेव्हा त्यांना किती जबरदस्त साक्ष मिळेल! (यश ११:६-९; ३५:५, ६; ६५:२१-२३; योहा ३:१६) पण या खास कार्यक्रमात फक्‍त वक्‍ताच त्या लोकांना साक्ष देणार नाही. तर आपण सर्वदेखील साक्ष देण्यात सहभागी होऊ शकतो. (रोम १५:७) याबद्दलच्या काही सूचना पुढं पाहा.

स्मारकविधीला आलेल्या पाहुण्याचं स्वागत करताना यहोवाचा एक साक्षीदार; स्मारकविधीला आलेल्या पाहुण्यांना बायबल दाखवताना यहोवाचा एक साक्षीदार
  • गेल्या-गेल्या लगेच आपल्या जागेवर बसून कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा, आपण आलेल्या नवीन लोकांचं आणि सत्यात थंड पडलेल्या लोकांचं हसतमुखानं स्वागत करू शकतो

  • आपण ज्यांना स्वतः बोलावलं आहे त्यांच्यावर तर आपण खास लक्ष दिलंच पाहिजे, पण अशा लोकांकडेही लक्ष द्या जे मोहिमेमध्ये मिळालेल्या आमंत्रणामुळं आले आहेत. नवीन लोकांना आपल्यासोबत बसायला बोलवा. आपलं बायबल आणि गीत पुस्तक त्यांना दाखवा

  • भाषण झाल्यानंतर, जर नवीन लोकांना काही प्रश्‍न असतील तर त्यांची उत्तरं द्या. दुसऱ्‍या मंडळीच्या कार्यक्रमासाठी हॉल लगेच खाली करायचा असल्यामुळं तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर काही दिवसांतच त्या व्यक्‍तीला भेटण्याची योजना करा. तुमच्याकडे तिचा पत्ता किंवा फोन नंबर नसेल तर, तुम्ही तिला विचारू शकता: “कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते जाणून घ्यायला मला आवडेल. मी तुम्हाला परत भेटू शकतो का?”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा