ख्रिस्ती जीवन
तुमच्या क्षेत्रातील सर्वांना स्मारकविधीचं आमंत्रण द्या!
२७ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या मोहिमेदरम्यान, आपण आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना येशूच्या स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देऊ या. आपण, आवड दाखवणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष देऊ म्हणजे आपल्याला त्यांची आवड जोपासता येईल.
पुढील गोष्टींकडं लक्ष द्या
सादरीकरण
“आम्ही एका खास कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रण देत आहोत. २३ मार्च रोजी जगभरात कोट्यवधी लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी आणि एक बायबल आधारित भाषण ऐकण्यासाठी एकत्र येतील. या आमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाची वेळ आणि पत्ता दिला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करा.”
एखाद्या व्यक्तीनं आवड दाखवली तर . . .
देवाचे राज्य काय आहे? ही पत्रिका सादर करा
पुनर्भेटीसाठी पाया घाला.
स्मारकविधीचा व्हिडिओ दाखवा
पुनर्भेटीसाठी पाया घाला.
तुम्ही परत जाल तेव्हा . . .
बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा
आपण ज्यामधून बायबल अभ्यास चालवतो असं एखादं प्रकाशन सादर करा.
बायबल नेमके काय शिकवते? सादर करा
पृष्ठे २०६-२०८ मधून स्मारकविधीबद्दल अधिक माहिती द्या आणि पुस्तक सादर करा.
देवाचे ऐका माहितीपत्रक सादर करा
पृष्ठे १८-१९ चा वापर करून, येशूच्या मृत्यूचा आपल्यासाठी काय अर्थ होतो यावर चर्चा करा आणि माहितीपत्रक सादर करा.