देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एज्रा १-५
यहोवा दिलेली वचनं पाळतो
जेरुसलेममधील मंदिरात खऱ्या उपासनेची पुनःस्थापना होईल, असं यहोवानं वचन दिलं होतं. पण बॅबिलोनच्या बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांसमोर अनेक अडथळे होते. शिवाय, मंदिराचं बांधकाम थांबवण्याची राजाज्ञादेखील होती. त्यामुळं, मंदिराचं बांधकाम कधीच पूर्ण होणार नाही, असंच अनेकांना वाटलं.
सुमारे इ.स.पू. ५३७
कोरेश राजा मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू करण्याची आज्ञा देतो
-
सातव्या महिन्यात
मंदिरातील वेदीची स्थापना केली जाते; अर्पणे केली जातात
-
इ.स.पू. ५३६
मंदिराचा पाया घातला जातो
-
इ.स.पू. ५२२
अर्तहशश्त राजा बांधकाम थांबवतो
-
इ.स.पू. ५२०
जखऱ्या व हाग्गय संदेष्ट्यांनी लोकांना, मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू करण्याचं उत्तेजन दिलं
-
इ.स.पू. ५१५
मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं