देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ इतिहास २९-३२
खऱ्या उपासनेत कष्ट घ्यावे लागतात
छापील आवृत्ती
हिज्किया पूर्ण निश्चयानं खऱ्या उपासनेची पुनःस्थापना करतो
इ.स.पू. ७४६-७१६
हिज्कियाची कारकीर्द
निसान महिना
१-८ तारखेपर्यंत: मंदीर स्वच्छ केलं
९-१६ तारखेपर्यंत: मंदिराचं पवित्रीकरण पूर्ण होतं
सर्व इस्राएल राष्ट्राला पश्चात्ताप करण्याची व खरी उपासना पुन्हा सुरू करण्याची वेळ सुरू झाली
इ.स.पू. ७४०
शोमरोनाचा पाडाव
हिज्किया सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांना उपासनेसाठी एकत्र येण्याचं आमंत्रण देतो
बैर-शेब्यापासून दानापर्यंत संपूर्ण देशात वल्हांडण सण साजरा करण्याविषयीची घोषणा करणारी पत्रे देण्यासाठी जासूद पाठवण्यात आले
काहींनी या व्यवस्थेची थट्टा केली पण बहुतेकांनी चांगला प्रतिसाद दिला