बायबल काय शिकवते पुस्तकातील वैशिष्ट्यांचा प्रभावीपणे उपयोग करा
बायबल नेमकं काय शिकवतं हे जेव्हा विद्यार्थी शिकतो आणि शिकलेल्या गोष्टींचा जीवनात अवलंब करतो तेव्हा आध्यात्मिक अर्थानं त्याची प्रगती होते व तो फळ देऊ लागतो. (स्तो. १:१-३) आपल्या विद्यार्थ्याला प्रगती करण्यास मदत करण्याकरता आपण, बायबल काय शिकवते पुस्तकातील काही वैशिष्ट्यांचा उपयोग करू शकतो.
अध्यायाच्या सुरुवातीचे प्रश्न: प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला काही प्रश्न दिलेले आहेत ज्यांची उत्तरं त्या अध्यायात आहेत. चर्चेच्या आधी विद्यार्थ्याची आवड वाढवण्यासाठी तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. किंवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याला विचारू शकता. त्यानं चुकीचं उत्तर दिलं असलं तरी, या प्रसंगी लगेच त्याची चूक सुधारायची गरज नाही. त्याच्या उत्तरावरून, त्याला कोणता मुद्दा समजायला जास्त मदत करावी लागेल, हे तुम्हाला समजेल.—नीति. १६:२३; १८:१३.
परिशिष्ट: परिच्छेदांतील माहिती विद्यार्थ्याला समजली असेल आणि त्याला ती मान्य असेल तर तुम्ही त्याला परिशिष्टातील अतिरिक्त माहिती त्याच्या फावल्या वेळी वाचण्याचं उत्तेजन देऊ शकता. आणि मग पुढच्या वेळी अभ्यास सुरू करण्याआधी, त्यानं वाचलेली माहिती त्याला समजली की नाही हे पाहण्यासाठी थोडा वेळ चर्चा करू शकता. पण समजा अभ्यासाच्या वेळी तुम्हाला परिशिष्टातील माहिती वाचून त्यावर चर्चा करावी लागत असेल तर तसं करा. परिशिष्टातील माहितीवर आधारित तुम्ही काही प्रश्न तयार केले असतील, तर तुम्ही तेही विचारू शकता. यामुळं विद्यार्थ्याचा फायदाच होईल.
उजळणीकरता असलेला चौकोन: प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उजळणीकरता असलेल्या चौकोनात, अध्यायाच्या सुरुवातीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. अध्यायातील मुख्य मुद्दे विद्यार्थ्याला समजले आहेत याची खातरी करण्यासाठी तुम्ही या चौकोनावर चर्चा करू शकता. प्रत्येक मुद्दा आणि सोबत असलेली वचनंदेखील वाचा. आणि या वचनांच्या आधारावर तो मुद्दा कसा सिद्ध होतो त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी विद्यार्थ्याला सांगा.—प्रे. कृत्ये १७:२, ३.