देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना समंजसपणा दाखवा
१ वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना आपण समंजसपणा दाखवला पाहिजे, यावर प्रेषित पौलानं जोर दिला. आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतात. काही लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात तर काहींना धर्माशी काही देणं-घेणं नसतं. आपल्याला या दोन्ही प्रकारच्या लोकांना राज्याचा संदेश सांगायचा आहे. त्यामुळं आपला संदेश “सर्वांना” आवडेल अशा प्रकारे सांगण्याकरता आपण समंजसपणा दाखवणं गरजेचं आहे.—१ करिंथ. ९:१९-२३.
२ क्षेत्र सेवेत समंजसपणा दाखवण्याचा अर्थ घरमालकाच्या आवडीच्या विषयानुसार आपला संदेश सादर करणं. यासाठी चांगली तयारी करणं आवश्यक आहे. आपल्याजवळ असलेल्या पुस्तकांतील व नियतकालिकांतील माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल तर लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचा उपयोग करू. वृद्ध, तरुण, कुटुंब प्रमुख, गृहिणी, कामाला जाणाऱ्या स्त्रिया व इतर लोक यांच्याबरोबर बोलताना आपण त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार सुवार्ता सादर केली पाहिजे.
३ घरमालकाशी बोलत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचं थोडक्यात निरीक्षण करा. तुम्हाला जाणवेल, की त्याला मुले आहेत, तो विशिष्ट धर्माचा आहे. किंवा, त्याला घर टापटिप ठेवण्यात आवड आहे. आता तुम्ही तुमच्या सादरतेत, त्याची परिस्थिती व आवडी-निवडी यांच्यानुसार फेरबदल करू शकता. त्याला विचारपूर्वक प्रश्न विचारा आणि तो देत असलेले उत्तर नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्या उत्तरांवरून तुम्हाला त्याच्या धार्मिक विश्वासांबद्दल व तो काय विचार करतो ते कळेल. आणि यानंतर तुम्ही तुमची सादरता पुढं चालू ठेवू शकता.
४ यहोवाची सेवा करण्यासाठी आपण चांगली तयारी करतो व समंजसपणा दाखवतो तेव्हा प्रेषित पौलाप्रमाणे आपणही म्हणू शकतो: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथ. ९:२२; नीति. १९:८.