वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१५ पृ. २
  • सेवकांनो प्रगती करत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवकांनो प्रगती करत राहा!
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • ‘विपुल फळ देत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • सेवाकार्यात प्रगतीशील असा
    आमची राज्य सेवा—२००८
  • शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km १/१५ पृ. २

सेवकांनो प्रगती करत राहा!

१. सर्व ख्रिस्ती जन सेवक असल्यामुळं त्यांनी प्रगती करत राहिलं पाहिजे हे पहिल्या शतकातील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतं?

१ सर्व ख्रिस्ती जन सेवक असल्यामुळं त्यांनी प्रगती केलीच पाहिजे. म्हणूनच येशूनं त्याच्या शिष्यांना प्रचार कार्याच्या बाबतीत प्रशिक्षण दिलं. यामुळं ते प्रचार कार्यातील त्यांच्या कौशल्यांमध्ये आणखी सुधारणा करू शकले. (लूक ९:१-५; १०:१-११) यामुळंच प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी अपुल्लोला “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.” (प्रे. कृत्ये १८:२४-२६) आणि यामुळंच पौलानंही सुवार्तेचा प्रचार करण्यात भरपूर अनुभव असलेल्या तीमथ्याला, त्याची “प्रगती सर्वांस दिसून यावी” म्हणून आपल्या शिकवण्याच्या पद्धतीकडं लक्ष देण्याचं उत्तेजन दिलं. (१ तीम. ४:१३-१५) आपण कदाचित अनेक वर्षांपासून सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे प्रभूची सेवा करत असू. तरीसुद्धा आपण आपल्या प्रचार करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करत राहिलं पाहिजे.

२. आपण इतरांकडून कसं शिकू शकतो?

२ इतरांकडून शिका: आपल्या शिकवण्याच्या पद्धतींत सुधारणा करण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांकडून शिकणे. (नीति. २७:१७) यासाठी आपल्यासोबत प्रचार काम करत असलेले प्रचारक कसं बोलतात त्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. लोकांबरोबर सहजपणे संभाषण सुरू करणाऱ्‍या प्रचारकांना आपण काही विशिष्ट बाबतीत मार्गदर्शन विचारू शकतो. आणि ते सांगत असलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकू शकतो. (नीति. १:५) पुनर्भेट कशी घ्यायची, बायबल अभ्यास कसा सुरू करायचा किंवा इतर मार्गांनी साक्ष कशी द्यायची याबाबतीत तुम्हाला काही मार्गदर्शन हवं आहे का? मग स्वतःहून आपल्या गट पर्यवेक्षकांशी किंवा एखाद्या अनुभवी प्रचारकाशी बोला. यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीनंसुद्धा तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करू शकता. तेव्हा नेहमी यहोवाला प्रार्थना करा.—लूक ११:१३.

३. सुधारणा करण्याच्या बाबतीत कोणी काही सांगितलं तर आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

३ तुम्ही अमुक एखाद्या बाबतीत सुधारणा केली पाहिजे, असं जर कोणा बांधवानं अथवा बहिणीनं तुम्हाला सांगितलं, तर त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. आणि तुम्ही विचारलं नसतानाही जर तुम्हाला त्यांनी तसं सांगितलं तर वाईट वाटून घेऊ नका. (उप. ७:९) अपुल्लोप्रमाणे ती मदत नम्रतेनं व आभारी मनोवृत्तीनं स्वीकारा. यातून तुमचा सुज्ञपणा दिसून येईल.—नीति. १२:१५.

४. सुवार्तेचा प्रचार करत राहण्याच्या बाबतीत प्रगती करण्यासाठी येशूनं कोणतं ठोस कारण दिलं?

४ प्रगती केल्यानं देवाचा गौरव होतो: सेवक असल्यामुळं आपण प्रगती केली पाहिजे हे समजण्यासाठी येशूनं त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला. त्यानं स्वतःची तुलना एका द्राक्षवेलीशी व आपल्या अभिषिक्‍त शिष्यांची तुलना त्या द्राक्षवेलीच्या फांद्यांशी केली. त्यानं म्हटलं, की “फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून” फळ धारण करणारी प्रत्येक फांदी त्याचा पिता साफसूफ करतो. (योहा. १५:२) द्राक्षमळ्याच्या मालकाची इच्छा असते, की त्याच्या मळ्यातील द्राक्षवेली फळांनी भरलेल्या असाव्यात. तसेच आपणही ‘ओठांच्या फळाचं’ भरघोस उत्पन्‍न काढत राहावं म्हणून आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करावी, अशी यहोवाची इच्छा आहे. (इब्री १३:१५) सुवार्तेचा प्रचार करण्याच्या बाबतीत आपण प्रगती करतो तेव्हा काय होतं? “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते” असं येशूनं म्हटलं. आणि आपल्याला यहोवाचे गौरव झालेलं पाहून समाधान मिळतं.—योहा. १५:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा