नवीन संशोधन साधन
आजवर लाखो प्रचारक, संस्थेच्या प्रकाशनांमध्ये संशोधन करण्यासाठी वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स याचा चांगला उपयोग करत आले आहेत. पण हे इंडेक्स अतिशय सविस्तर असल्यामुळे ते फक्त काही भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक हे नवीन साधन १७० भाषांमध्ये तसेच, अमेरिकन संकेत भाषा, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, नेपाळी, पंजाबी, तमीळ व तेलगू या भाषांमध्येही तयार करण्यात आले आहे. संशोधन मार्गदर्शक यात प्रामुख्याने २००० सालापासूनच्या प्रकाशनांचा संदर्भ देण्यात आला आहे. ज्या भाषांमध्ये इंडेक्स आहे त्या भाषांमध्ये संशोधन मार्गदर्शक छापण्यात आलेले नाही. पण, वॉचटावर लायब्ररी व वॉचटावर—ऑनलाईन लायब्ररीच्या इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. संशोधन मार्गदर्शकामुळे तुम्ही बायबल प्रश्नांची उत्तरे शोधू शकता व तुम्हाला वैयक्तिक रीत्या काही प्रश्न असतील तर त्यांबद्दलची माहितीही मिळवू शकता. इतकेच नव्हे तर तुम्ही सभांची व कौटुंबिक उपासनेचीदेखील तयारी करू शकता.