ऑक्टोबर २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा १५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद ७-१० (१० मि.)
क्र. १: अनुवाद ९:१५-२९ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: उपासनेत मूर्तींचा, प्रतिमांचा उपयोग केल्याने देवाचा अपमान होतो—बायबल विषय २६क (५ मि.)
क्र. ३: अदोनीय—यहोवाच्या निर्णयांवर शंका घेऊ नका—१राजे १:५-५३; २:१३-२५ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: “शिकवण्याची कला सुधारण्यासाठी—मुख्य मुद्द्यांवर जोर द्या.” चर्चा.
१५ मि: १९१४ बद्दलचा आपला विश्वास समजावून सांगण्यासाठी एक साधन. सुरुवातीला सात मिनिटांचे प्रात्यक्षिक दाखवा. त्यात प्रचारक, बायबल काय शिकवते पुस्तकातील पृष्ठ २१६ वर दिलेल्या तक्त्याचा उपयोग करतो आणि दानीएलाच्या चौथ्या अध्यायातील भविष्यवाणी देवाच्या राज्याशी कशी संबंधित आहे हे बायबल विद्यार्थ्याला समजावून सांगतो. प्रात्यक्षिक प्रभावशाली का होते हे श्रोत्यांना विचारा. शेवटी, प्रकटीकरण १२:१०, १२ ही वचने वाचा आणि देवाचे राज्य १९१४ पासून शासन करत आहे या जाणिवेमुळे आपल्याला निकडीच्या भावनेने सुवार्तेचा प्रचार करण्याची प्रेरणा कशी मिळते ते श्रोत्यांना विचारा.
गीत ४३ आणि प्रार्थना