ऑक्टोबर ६ च्या सप्ताहाचा आराखडा
६ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा १२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद १-३ (१० मि.)
क्र. १: अनुवाद २:१६-३० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: श्रीमंत मनुष्य आणि लाजार यांचा अहवाल चिरकालिक यातनेचा पुरावा नाही—बायबल विषय १५ग (५ मि.)
क्र. ३: लैंगिक संबंध ठेवणे पाप आहे, असे बायबल शिकवते का? (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: ऑक्टोबर महिन्यादरम्यान नियतकालिक सादर करणे. चर्चा. या पानावर दिलेल्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून ऑक्टोबर - डिसेंबर टेहळणी बुरूज कसे सादर केले जाऊ शकते याचे एक प्रात्यक्षिक दाखवून चर्चेची सुरुवात करा. त्यानंतर नमुना सादरीकरणातील वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: आपण काय साध्य केले? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीकरता पाया घाला” या लेखातील मुद्दे लागू केल्यामुळे कसा फायदा झाला ते प्रचारकांना विचारा. आणि त्यांना कोणते चांगले अनुभव आले तेही विचारा.
गीत ५२ आणि प्रार्थना