सप्टेंबर १ च्या सप्ताहाचा आराखडा
१ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १८ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ५, ६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १७-२१ (१० मि.)
क्र. १: गणना १७:१-१३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आज, विश्वासाने बरे करण्याला देवाच्या मान्यतेचा पुरावा नाही—बायबल विषय २२ग (५ मि.)
क्र. ३: ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो—बायबल कथा २६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण काय साध्य केले? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आत्मविश्वासाने राज्याबद्दल बोला.” या लेखात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे प्रचारकांना कोणता फायदा झाला हे त्यांना विचारा. तसेच, राज्याबद्दल बोलताना श्रोत्यांना कोणती आव्हाने आली आणि त्यांनी त्यांचा सामना कसा केला याबद्दल आलेले अनुभव विचारा.
१५ मि: खास मोहिमेबद्दलचा अहवाल. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. राज्याची घोषणा करत राहण्याच्या गरजेबद्दल आपली राज्य सेवा याच्या याच अंकातील मुख्य मुद्द्यांची उजळणी करा. राज्याची घोषणा करत राहण्याच्या उत्तेजनाला बांधवांनी कसा प्रतिसाद दिला? मोहिमेदरम्यान साध्य केलेल्या कार्याची कोणती काही वैशिष्ट्ये आहेत?
गीत ४५ आणि प्रार्थना