ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२५ ऑगस्ट २०१४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल.
१. लेवीय १८:३ या वचनातून आपण कोणता धडा शिकतो? [जुलै ७, टेहळणी बुरूज१० ६/१५ पृ. ८ परि. १५]
२. लेवीय १९:२ यात सांगितलेल्या आज्ञेवरून आपण काय शिकतो? [जुलै ७, टेहळणी बुरूज१० ७/१५ पृ. १९ परि. १६]
३. सरवा वेचण्यासंबंधी देवाने प्राचीन काळात दिलेल्या आज्ञेवरून आपण काय शिकू शकतो? (लेवी. १९:९, १०) [जुलै ७, टेहळणी बुरूज०६ ६/१५ पृ. २२-२३ परि. १३]
४. “डोळ्याबद्दल डोळा” हा नियम सुडाचे समर्थन करणारा नव्हता असे का म्हणता येईल? (लेवी. २४:१९, २०) [जुलै १४, टेहळणी बुरूज१० १/१ पृ. १२ परि. ३-४]
५. इस्राएल लोकांना कोणत्या परिस्थितींत बिनव्याजावर पैसे उसने देण्याची आज्ञा देण्यात आली होती? (लेवी. २५:३५-३७) [जुलै २१, टेहळणी बुरूज०४ १०/१५ पृ. २९ परि. १]
६. अरण्यात ज्यांच्या भोवती तीन वंशाच्या विभागांना डेरा द्यायचा होता त्या कोणत्या ‘निशाणी’ होत्या? (गण. २:१, २) [जुलै २८, टेहळणी बुरूज०४ ८/१ पृ. २४ परि. ५]
७. गणना ८:२५, २६ यात लेव्यांच्या बंधनकारक सेवेविषयी जो अहवाल दिला आहे त्यातून वयोवृद्धांबद्दल विचारशीलता दाखवण्याच्या बाबतीत आपण काय शिकतो? [ऑग. ११, टेहळणी बुरूज०४ ८/१ पृ. २५ परि. १]
८. इजिप्तमधून चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यानंतर इस्राएल लोकांनी कुरकूर करण्याची मनोवृत्ती का विकसित केली, आणि या अहवालातून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो? (गण. ११:४-६) [ऑग. १८, टेहळणी बुरूज९५ ३/१ पृ. १६ परि. १०]
९. एलदाद व मेदाद संदेष्ट्यांप्रमाणे वागू लागले तेव्हा मोशेने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो? (गण. ११:२७-२९) [ऑग. १८, टेहळणी बुरूज०४ ८/१ पृ. २६ परि. ४]
१०. इस्राएल लोकांनी “आपल्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावावे” अशी जी आज्ञा त्यांना देण्यात आली होती त्यावरून आपण कोणते महत्त्वाचे तत्त्व शिकू शकतो? (गण. १५:३७-३९) [ऑग. २५, टेहळणी बुरूज०४ ८/१ पृ. २६ परि. ७]