सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी— आत्मविश्वासाने राज्याबद्दल बोला
हे का महत्त्वाचे: २ तीमथ्य १:७, ८ यात दिलेल्या सल्याचे पालन करायचे असल्यास राज्याबद्दल आत्मविश्वासाने बोलणे फार महत्त्वाचे आहे. पण, आपण राज्याची घोषणा आत्मविश्वासाने कशी करू शकतो?
हे कसे करावे:
• लोकांबद्दल सहानुभूती बाळगा. (फिलिप्पै. २:४) आज अनेक जण जगातील परिस्थितीमुळे किंवा स्वतःच्या समस्यांमुळे दुःखी आहेत. लोकांविषयी सहानुभूती बाळगल्यास त्यांना राज्याबद्दल सांगण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.
• घरातून बाहेर पडण्याआधी सोबत काही पत्रिका घ्या.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• कोणाला साक्ष द्यावी हे काळजीपूर्वक ठरवा. बोलण्याची योग्य संधी मिळावी आणि धैर्याने बोलता यावे म्हणून यहोवाला प्रार्थना करा.