यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
१. यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकाचा अभ्यास आपण कधीपासून सुरू करणार आहोत? आणि याचा आपल्याला कसा फायदा होईल?
१ मंडळीच्या बायबल अभ्यासासाठी २३ जूनच्या आठवड्यापासून यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकाचा उपयोग केला जाईल. हे नवीन माहितीपत्रक “आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा!” या प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित करण्यात आले होते. बायबल विद्यार्थ्यांना संघटनेकडे वळवण्यासाठी हे बनवण्यात आले आहे. याच्या अभ्यासामुळे आपण यहोवाच्या संघटनेचा भाग आहोत याबद्दलची आपली कदर वाढेल त्याचबरोबर सेवेत उपयोग करण्यासाठी आपण या माहितीपत्रकाशी चांगल्या प्रकारे परिचित होऊ.—स्तो. ४८:१३.
२. मंडळीत या माहितीपत्रकाचा अभ्यास कसा केला जाईल?
२ अभ्यास कसा केला जाईल? प्रत्येक धड्याला एकसारखा वेळ मिळेल अशा प्रकारे संचालकाने वेळेची विभागणी करावी. प्रश्नाच्या रूपात असलेले शीर्षक वाचून तो प्रत्येक धड्याचा परिचय करून देईल; असे तो सर्व २८ धड्यांसाठी करेल. मग संचालक वाचकाला प्रस्तावना वाचण्यास सांगेल व त्या भागासाठी त्याने तयार केलेला प्रश्न विचारेल. त्यानंतर, ठळक अक्षरांत असलेल्या वाक्याने सुरू होणारा प्रत्येक भाग वाचून घेऊन त्यावर चर्चा करेल. भाग वाचल्यावर संचालक, प्रश्न रूपात असलेल्या शीर्षकाचे उत्तर वाचलेल्या भागात कसे मिळते ते श्रोत्यांना विचारेल. माहितीपत्रकात असलेल्या उदाहरणांवरसुद्धा चर्चा केली जाऊ शकते. वेळ असेल तर मुख्य शास्त्रवचने वाचावीत. पुढील धड्याची चर्चा करण्याआधी संचालक आधीच्या धड्याच्या शेवटी असलेले प्रश्न विचारून उजळणी घेतील. धड्यात “अधिक जाणून घ्या” ही चौकट असेल तर तो ती वाचून घेईल आणि चौकटीत दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास बायबल विद्यार्थ्याला कोणकोणते फायदे होतील यांवर श्रोत्यांचे मत विचारेल. वेळ असेल तर अभ्यासाच्या शेवटी संचालक धड्याचे शीर्षक, उजळणी प्रश्न म्हणून उपयोगात आणू शकतो. गृह बायबल अभ्यासासाठी या पद्धतीचा वापर करण्याची गरज नाही, ही गोष्ट आपण आठवणीत ठेवू शकतो.
३. आपण या माहितीपत्रकाचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो?
३ माहितीपत्रकाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी चांगली तयारी करून या. उत्तरे देऊन अभ्यासात सहभाग घेण्याचा प्रयत्न करा. चर्चेदरम्यान, दिलेली माहिती बायबल विद्यार्थ्याला का फायदेकारक आहे याचा विचार करा. या नवीन माहितीपत्रकाचा अभ्यास करण्याद्वारे आपण इतरांना यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो जेणेकरून त्यांनाही सार्वकालिक जीवनाची आशा मिळेल.—१ योहा. २:१७.