कमी शिकलेल्यांना मदत करणे
१. कमी लिहिता-वाचता येत असलेल्यांना मदत करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात?
१ कमी लिहिता-वाचता येत असलेल्या घरमालकांना वाचन अवघड वाटत असले तरी त्यांना आध्यात्मिक गोष्टींत आवड असू शकते; पण बायबल व इतर पुस्तके पाहून ते कदाचित कचरतील. अशा लोकांना बायबल काय शिकवते सादर केल्यास सुरुवातीला तरी जास्त फायदा होणार नाही. मग अशा लोकांना आपण आध्यात्मिक रीत्या मदत कशी करू शकतो? आम्ही जगभरातील २० पेक्षा जास्त देशातील अनुभवी प्रचारकांना याबाबत विचारले. त्यांनी सुचवलेल्या गोष्टी खाली सांगितल्या आहेत.
२. कमी लिहिता-वाचता येणाऱ्यांना मदत करण्यासाठी कोणती साहित्ये प्रभावशाली ठरू शकतात?
२ विद्यार्थ्याला कमी लिहिता-वाचता येत असेल किंवा त्याला वाचताच येत नसेल तर तुम्ही देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका व सदासर्वकाळ जिवंत राहा हे माहितीपत्रक वापरू शकता. अमेरिकेतील एक सामान्य पायनियर ही दोन्ही माहितीपत्रके घरमालकासमोर ठेवून त्याला विचारतो की यांपैकी कोणत्या माहितीपत्रकातून त्याला अभ्यास करायला आवडेल. केनिया येथील शाखा कार्यालयाने सांगितले, की त्यांच्या क्षेत्रात ही माहितीपत्रके खूप प्रभावशाली ठरली आहेत कारण आफ्रिकेत लोकांना प्रश्नोत्तरांच्या चर्चेद्वारे नव्हे तर गोष्टींच्या रूपाने शिकवण्याची पद्धत रूढ आहे. सुशिक्षित लोक परिच्छेद वाचून त्यावर चर्चा करण्यास लगेच तयार होतील; परंतु कमी शिक्षण झालेल्यांना अभ्यास करण्याची ही पद्धत अवघड वाटेल. विद्यार्थ्याला वाचता येत असेल तर बहुतेक प्रचारक देवाकडून आनदांची बातमी! या माहितीपत्रकातून किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकातून त्याचा अभ्यास सुरू करतील.
३. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्याबद्दलच्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास आपल्याला त्यांना मदत करणे सोपे जाईल?
३ प्रशंसा करा: शिक्षण न झालेल्यांच्या मनात कमीपणाच्या भावना येऊ शकतात. अशा लोकांना सत्य शिकवताना सर्वात आधी त्यांचा आत्मविश्वास वाढवा. शिक्षण न झालेले बहुतेक लोक हुशार असतात आणि ते शिकू शकतात. त्यांना आदर दाखवून सन्मानाने वागा. (१ पेत्र ३:१५) ते करत असलेले प्रयत्न वाया जात नाहीत व ते आध्यात्मिक प्रगती करत आहेत हे जेव्हा त्यांना जाणवते तेव्हा ते अभ्यास सुरू ठेवण्यास प्रेरित होतील. त्यामुळे, त्यांची तोंडभरून स्तुती करा.
४. कमी लिहिता-वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यासाची तयारी करण्याचे प्रोत्साहन कसे देऊ शकतो?
४ विद्यार्थ्याला कमी लिहिता-वाचता येत असले तरी त्याला अभ्यासाची तयारी करण्याचे प्रोत्साहन द्या. दक्षिण आफ्रिकेतील काही प्रचारक त्यांच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना चांगल्या प्रकारे लिहिता-वाचता येते अशा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची किंवा मित्राची मदत घेण्याचे उत्तेजन देतात. ब्रिटनमधील एक प्रचारक त्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान काही परिच्छेद पाहण्यासाठी स्वतःचे पुस्तक त्यांच्या हातात देतो. यामुळे, विद्यार्थ्याला कळते, की उत्तरांच्या खाली रेघा मारलेल्या असतात तेव्हा उत्तरे शोधणे किती सोपे असते. भारतातील एक बांधव पुढच्या आठवडी अभ्यासल्या जाणाऱ्या भागातील चित्रे पाहून त्यांवर मनन करण्याचे उत्तेजन देतो.
५. अभ्यास चालवताना आपण धीर कसा दाखवू शकतो?
५ धीर दाखवा: तुम्ही कोणतेही साहित्य वापरत असला तरी मुख्य मुद्यांवर लक्ष केंद्रित करा आणि हे मुद्दे तुमच्या विद्यार्थ्याला चांगल्या रितीने समजण्यास मदत करा. सुरुवातीला १० ते १५ मिनिटांची चर्चा उचित ठरेल. खूप सारे मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका; त्याऐवजी प्रत्येक वेळी काही परिच्छेदांवरच चर्चा करा. जर विद्यार्थी सावकाश वाचन करत असेल तर धीर धरा. यहोवाबद्दल जसजशी त्याच्या मनात कदर वाढेल तसतसे त्याचे वाचन सुधारण्यास तो प्रेरित होईल. यासाठी तुम्ही त्याला अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच सभेला येण्याचे प्रोत्साहन दिल्यास बरे राहील.
६. आपण लोकांना वाचायला शिकण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो?
६ बायबल विद्यार्थी चांगल्या रितीने वाचायला शिकल्यावरच त्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होईल. (स्तो. १:१-३) काही प्रचारक बायबल विद्यार्थ्यांना लिहायला आणि वाचायला शिकवण्यासाठी प्रत्येक बायबल अभ्यासानंतर थोडा वेळ काढतात. ते ॲप्लाय युवरसेल्फ टू रिडींग ॲण्ड रायटिंग हे प्रकाशन जर त्यांच्या भाषेत उपलब्ध असेल तर त्याचा वापर करतात किंवा बाहेरील इतर साहित्यांचा उपयोग करतात. तुमचा विद्यार्थी निराश झाला असेल तर त्याने कोणकोणत्या बाबतींत प्रगती केली त्या गोष्टी त्याला दाखवून त्याचा आत्मविश्वास वाढवा. तो करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल ही खातरी त्याला द्या आणि त्याला प्रार्थना करण्याचे उत्तेजन द्या. (नीति. १६:३; १ योहा. ५:१४, १५) ब्रिटनमधील काही प्रचारक त्यांच्या विद्यार्थ्यांना, साध्य करता येण्याजोगी परंतु प्रगतिशील ध्येये ठेवण्याचे उत्तेजन देतात. जसे की, आधी अक्षरांची ओळख करून ती वाचायला शिकणे मग निवडक शास्त्रवचने शोधून ती वाचणे आणि मग सोपी भाषा वापरलेली बायबल आधारित प्रकाशने वाचणे, वगैरे. लोकांना वाचायला मदत करण्यात, त्यांना फक्त वाचन कसे करायचे एवढेच शिकवणे पुरेसे नाही तर त्यांना तसे मनापासून करावेसे वाटायला प्रवृत्त करणे समाविष्ट आहे.
७. कमी लिहिता-वाचता येणाऱ्यांना सत्याची ओळख करून देण्यापासून आपण माघार का घेऊ नये?
७ यहोवा कमी शिकलेल्या लोकांना तुच्छ लेखत नाही. (ईयो. ३४:१९) तो त्यांची मने पारखतो. (१ इति. २८:९) त्यामुळे, कमी लिहिता-वाचता येणाऱ्या लोकांना सत्याची ओळख करून देण्यास माघार घेऊ नका. त्यांना सत्य शिकवण्यास सुरुवात करण्यासाठी तुमच्याकडे अनेक साधने आहेत. नंतर तुम्ही बायबल काय शिकवते या पुस्तकातून अभ्यास घेऊ शकता आणि त्यांना शास्त्रवचने अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करू शकता.
[६ पानांवरील चित्र]
शिक्षण न झालेल्यांच्या मनात कमीपणाच्या भावना येऊ शकतात. अशा लोकांना सत्य शिकवताना सर्वात आधी त्यांचा आत्मविश्वास वाढवा.
[६ पानांवरील चित्र]
घरमालकाला लिहिता-वाचता येत नसेल तर हे करून पाहा:
• सुरुवातीला देवाचे ऐका, देवाचे ऐका व सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा किंवा दुसऱ्या एखाद्या योग्य प्रकाशनाचा वापर करा.
• त्यांना आदर दाखवा व तोंडभरून स्तुती करा.
• खूप सारे मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.
• वाचनक्षमता वाढवण्यासाठी त्यांना मदत करा.
विद्यार्थी जर सत्याविषयी कदर आणि शिकण्याची उत्सुकता दाखवत असेल तर तुम्ही बायबल काय शिकवते या पुस्तकातून अभ्यास घ्यायला सुरू करू शकता.