वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा खालीलपैकी कोणतीही पत्रिका: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार आहे!, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, शांतिदायक नवीन जगातील जीवन, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाने आवड दाखवल्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा वापर करून किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा.

◼ सोमवार, १४ एप्रिल २०१४ रोजी स्मारकविधी साजरा केला जाईल. तुमच्या मंडळीची सभा जर सोमवारच्या दिवशी होत असेल तर त्या आठवड्यात ज्या दिवशी राज्य सभागृह उपलब्ध असेल त्या दिवशी सभा घेतली जावी. पण, सेवा सभा रद्द करावीच लागली तर मंडळीच्या वडीलवर्गाचे संयोजक आराखड्यात बदल करू शकतात, जेणेकरून जे भाग मंडळीला विशेष लागू होतात ते त्या महिन्यादरम्यान हाताळले जाऊ शकतील.

◼ २०१४ सेवावर्षादरम्यान विभागीय पर्यवेक्षकांच्या जाहीर भाषणाचा विषय आहे: “जगातील समस्यांपासून सुटका.”

◼ १६ जून २०१४ च्या आठवड्यापासून मंडळीत, यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकाचा अभ्यास केला जाईल. या माहितीपत्रकाचा अभ्यास संपल्यानंतर, म्हणजे २५ ऑगस्ट २०१४ च्या आठवड्यापासून बायबल कथांचं माझं पुस्तक यातून अभ्यास घेतला जाईल. मंडळ्यांना ही प्रकाशने हवी असल्यास, पुढच्या वेळी साहित्याची मागणी करताना ही प्रकाशनेदेखील मागवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा