वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१४ पृ. १
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km १/१४ पृ. १

संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा

१. मीखाच्या मनात कोणता प्रश्‍न उद्‌भवला असेल, आणि त्याने केलेले प्रचार काम वाया का गेले नाही?

१ ‘या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत केव्हा केला जाईल?’ इस्राएल आणि यहूदा राज्यांच्याविरुद्ध संदेष्टा मीखा यहोवाच्या न्यायाचा संदेश जाहीर करत असताना त्याच्याही मनात हाच प्रश्‍न आला असावा. पण त्याने केलेले प्रचार काम वाया गेले नाही. सा.यु.पू. ७४० मध्ये म्हणजे मीखाच्या जिवंतपणीच शोमरोनाविरुद्ध यहोवाने केलेली वचने पूर्ण झाली. (मीखा १:६, ७) नंतर सा.यु.पू. ६०७ मध्ये यरुशलेमेचा नाश करण्यात आला. (मीखा ३:१२) यहोवाच्या न्यायाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण मीखाचे अनुकरण कसे करू शकतो?

२. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण सहनशीलता का आणि कशी दाखवली पाहिजे?

२ सहनशील असा: मीखाने लिहिले: “मी तर परमेश्‍वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन.” (मीखा ७:७) अर्थात, मीखा हातावर हात ठेवून बसला नाही तर यहोवाचा संदेष्टा म्हणून व्यस्त राहिला. आपणही यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना, “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” व्यस्त राहिले पाहिजे. (२ पेत्र ३:११, १२) यहोवा सहनशील असल्यामुळे लोकांना पश्‍चात्ताप करण्याची संधी मिळत आहे. (२ पेत्र ३:९) त्यामुळे मीखासारखी सहनशीलता दाखवण्याबद्दल बायबल देत असलेला सल्ला आपण मान्य करतो.—याको. ५:१०.

३. आपण यहोवाच्या पवित्र आत्म्यासाठी त्याला विनंती का केली पाहिजे?

३ यहोवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहा: जरी मीखाला एक आव्हानात्मक काम नेमण्यात आले होते तरी ते पूर्ण करण्यासाठी तो यहोवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहिला. (मीखा ३:८) म्हणूनच यहोवाचे वचन आपल्याला त्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहण्यास आर्जवते. तो थकलेल्यांना उदारतेने आपले सामर्थ्य देतो ज्यामुळे ते त्यांच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करू शकतील. (स्तो. ८४:५, ७; यश. ४०:२८-३१) तुम्ही तुमच्या पवित्र सेवेमध्ये व्यक्‍तिगत रीत्या असा अनुभव घेतला आहे का? तुम्ही नियमित रीत्या यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी यहोवाला विनंती करता का?—लूक ११:१३.

४. मीखाच्या जीवनशैलीचे आपण अनुकरण कसे करू शकतो?

४ मीखाच्या पूर्ण जीवनामध्ये त्याने यहोवाच्या इच्छेला प्राधान्य दिले. जरी त्याच्या आजूबाजूला भ्रष्ट लोक होते तरी त्याने विश्‍वासात खंबीर राहण्याचा निर्धार केला होता. त्याचप्रमाणे दररोजच्या जीवनात आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा घेतली जाते. म्हणून आपण “परमेश्‍वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ” चालण्याचा संकल्प करू या.—मीखा ४:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा