घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. डिसेंबर: राज्य वार्ता क्र.३८. तुमच्या संपूर्ण क्षेत्रात राज्य वार्ता वाटून झाल्यानंतर किंवा साठा संपल्यानंतर तुम्ही, देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता. जानेवारी आणि फेब्रुवारी: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, बायबल मानवजातीला कोणता संदेश देते?, किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.