ऑक्टोबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
२१ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १७ परि. १६-२० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ थेस्सलनीकाकर १-२ थेस्सलनीकाकर ३ (१० मि.)
क्र. १: १ थेस्सलनीकाकर २:९-२० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: शलमोनाने ज्या चांगल्या व वाईट गोष्टी केल्या त्यांवरून आपण काय शिकू शकतो?—रोम. १५:४ (५ मि.)
क्र. ३: पृथ्वीवरचे राक्षस—बायबल कथा ८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. मार्क १:४०-४२, मार्क ७:३२-३५ आणि लूक ८:४३-४८ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
१५ मि: “तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या वेबसाईटचा उपयोग करा.” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, कुटुंबांनी त्यांच्या कौटुंबिक उपासनेत आपल्या अधिकृत वेबसाईटचा उत्तम उपयोग कसा केला ते त्यांना विचारा.
गीत ४१ आणि प्रार्थना