नमुना सादरीकरणे
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“आपण देवाला प्रार्थना करतो. देवावर विश्वास नसलेले नास्तिक लोकही, संकटात असतात तेव्हा त्याला प्रार्थना करतात. तुम्हाला काय वाटतं देव सर्वांच्या प्रार्थना ऐकतो का? [उत्तरासाठी थांबा.] देवाने आपली प्रार्थना ऐकावी म्हणून आपण काय केले पाहिजे याबद्दल तुम्हाला काही शास्त्र आधारित माहिती सांगितली तर चालेल का?” घरमालकाला आवड असल्यास ऑक्टोबर ते डिसेंबर टेहळणी बुरूज नियतकालिकाचे शेवटचे पान दाखवा आणि तेथे दिलेल्या दुसऱ्या प्रश्नाखालील माहितीवर आणि निदान एका वचनावर चर्चा करा. नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“देव दुःख काढून का टाकत नाही असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही लोकांच्या भेटी घेतो. तुम्हालाही असंच वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] दुःख आणि यातना नसलेल्या एका काळाविषयी आपला निर्माणकर्ता आपल्याला काय अभिवचन देतो ते मी तुम्हाला दाखवू का? [घरमालकाला आवड असल्यास प्रकटीकरण २१:४ वाचा.] आज इतके दुःख का आहे यामागची पाच मुख्य कारणे या नियतकालिकात सांगण्यात आली आहेत. त्याचबरोबर देव दुःख कसे काढून टाकणार आहे याबद्दल शास्त्रवचन काय सांगते तेही यात सांगितले आहे.”