क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
मार्च २०१३
स्मारक विधीच्या मोहिमेवर यहोवाचा समृद्ध आशीर्वाद असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या वर्षी, प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीस १,०८,४६७ जण उपस्थित होते. मार्च महिन्याच्या अहवालावरून दिसून येते, की आपल्या कार्याच्या वेगवेगळ्या पैलूंत आपण नवीन उच्चांक गाठले. प्रचारकांची एकूण संख्या ३७,२४८ होती; त्यांपैकी ४,१६१ सामान्य पायनियर होते आणि ५०,३४७ बायबल अभ्यास चालवण्यात आले.