देवाचे वचन शिक्षण देण्यास उपयुक्त
१. २०१४ सेवा वर्षातील आपल्या विभागीय संमेलन कार्यक्रमाचा विषय काय आहे, आणि त्या कार्यक्रमात कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल?
१ आपला महान शिक्षक, यहोवा हा विश्वातील सगळ्यात उत्तम शिक्षक आहे. (यश. ३०:२०, २१) पण, यहोवा कशा प्रकारे आपल्याला शिक्षण देतो? तो आपल्याला त्याचे प्रेरित वचन, बायबल याद्वारे शिकवतो. जगातील कोणत्याही पुस्तकापेक्षा हे पुस्तक सगळ्यात श्रेष्ठ आहे. देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक रीत्या कसा फायदा होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर, २०१४ सेवा वर्षातील आपल्या विभागीय संमेलनात दिले जाईल. संमेलन कार्यक्रमाचा विषय आहे: ‘देवाचे वचन शिक्षण देण्यास उपयुक्त,’ जो २ तीमथ्य ३:१६ वर आधारित आहे.
२. कोणत्या प्रश्नांच्या उत्तरांवरून कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे स्पष्ट होतील?
२ मुख्य मुद्द्यांकडे लक्ष द्या: कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे पुढील प्रश्नांच्या उत्तरांवरून स्पष्ट होतील:
• देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो? (यश. ४८:१७, १८)
• यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्यासाठी आपण जीवनात फेरबदल केले तर आपण कशाची शाश्वती बाळगू शकतो? (मला. ३:१०)
• ‘विचित्र शिक्षणाच्या’ संपर्कात आल्यास आपली काय प्रतिक्रिया असावी? (इब्री १३:९)
• येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे आपण कसे अनुकरण करू शकतो? (मत्त. ७:२८, २९)
• मंडळीत शिक्षण देणाऱ्यांनी स्वतःला शिकवणे का महत्त्वाचे आहे? (रोम. २:२१)
• देवाचे वचन कशासाठी उपयुक्त आहे? (२ तीम. ३:१६)
• राष्ट्रांना ‘हालवले’ जाते तेव्हा लोकांवर काय परिणाम होतो? (हाग्ग. २:६, ७)
• यहोवाला आपल्याबद्दल काय खातरी आहे? (इफिस. ५:१)
• आपण यहोवाच्या शिक्षणानुसार चालत राहण्याचा नेटाने प्रयत्न का केला पाहिजे? (लूक १३:२४)
३. विभागीय संमेलनाला उपस्थित राहणे व तो कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकणे का महत्त्वाचे आहे?
३ विभागीय संमेलनाचा विषय ज्या वचनावर आधारित आहे म्हणजे २ तीमथ्य ३:१६ यातील शब्द लिहिण्याआधी पौलाने शेवटल्या काळातील कठीण दिवसांचे वर्णन केले. त्याने म्हटले: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीम. ३:१३) आपली फसवणूक केली जाऊ नये म्हणून देवाकडून मिळणारे शिक्षण स्वीकारणे व ते लागू करणे किती महत्त्वाचे आहे! तेव्हा, अगदी उचित वेळी तयार केलेल्या या विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याचा व तो कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकण्याचा आपण निश्चय करू या.