जुलै १ च्या सप्ताहाचा आराखडा
१ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १२ परि. १०-१६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ११-१४ (१० मि.)
क्र. १: प्रेषितांची कृत्ये ११:१-१८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: येशू ख्रिस्ताचा वध केला जातो—बायबलचा संदेश पृ. २३ (५ मि.)
क्र. ३: तुमचे खरे मित्र कोण आहेत?—स्तो. ११९:६३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: जुलै महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रातील लोकांना जुलै – सप्टेंबर टेहळणी बुरूज नियतकालिक का आवडेल ते एका मिनिटाच्या आत सांगा. त्यानंतर, मुख्य विषयाचा उपयोग करून, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा व नंतर कोणते शास्त्रवचन वाचू शकतो ते विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. लूक १२:१६-३१ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
गीत ३५ आणि प्रार्थना