यहोवाची स्तुती करण्याच्या अनेक संधी
१. कोणती नवीन तरतूद आपल्याला यहोवाचे “पुष्कळ उपकारस्मरण” करण्यास मदत करेल?
१ गेल्या मार्च महिन्यापासून एक नवीन तरतूद करण्यात आली, ती म्हणजे प्रचारक दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात आणि विभागीय पर्यवेक्षकांची भेट असते त्या महिन्यात ३० तास भरून साहाय्यक पायनियरींग करू शकतात. जर विभागीय पर्यवेक्षकांची भेट महिन्याच्या शेवटी सुरू होऊन दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार असेल तर प्रचारक यांपैकी कोणत्याही एका महिन्यात ३० तास भरून साहाय्यक पायनियरींग करू शकतात. सामान्य आणि खास पायनियरांसाठी असलेल्या सभेत साहाय्यक पायनियर संपूर्ण वेळ बसू शकतात. म्हणजे जरी आपण ५० तास भरू शकत नसलो तरी वर्षातून चार वेळा ३० तास भरून साहाय्यक पायनियर या नात्याने यहोवाचे “पुष्कळ उपकारस्मरण” करू शकतो.—स्तो. १०९:३०; ११९:१७१.
२. विभागीय पर्यवेक्षकाच्या भेटीदरम्यान जे साहाय्यक पायनियरींग करतील ते कशाचा आनंद घेतील?
२ विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान: आता विभागीय पर्यवेक्षकाच्या भेटीदरम्यान आपल्यातील बरेच जण साहाय्यक पायनियरींग करू शकतील आणि विभागीय पर्यवेक्षकासोबत प्रचार कार्य करण्याद्वारे उत्तेजन मिळवू शकतील. (रोम. १:११, १२) आपल्यातील बरेच साहाय्यक पायनियर कदाचित त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेण्याची योजना करतील. आठवडाभर नोकरी करणारे बंधू-भगिनी विभागीय पर्यवेक्षकांना त्यांच्यासोबत शनिवारी किंवा रविवारी प्रचार कार्य करण्यास विचारू शकतात. त्याचबरोबर सामान्य व खास पायनियरांसोबत पायनियर सभेला उपस्थित राहिल्याने साहाय्यक पायनियरांना किती प्रोत्साहन मिळेल!
३. स्मारकविधीचा कालावधी हा साहाय्यक पायनियरींग करण्याकरता उत्तम का आहे?
३ मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान: आधीच्या तरतुदीनुसार ज्या प्रचारकांनी स्मारकविधीदरम्यान ३० तास भरून साहाय्यक पायनियरींग केली, ते आता त्यांच्या “स्तुतीचा यज्ञ” दुप्पट प्रमाणात अर्पण करू शकतात. (इब्री १३:१५) साहाय्यक पायनियर म्हणून आपली सेवा वाढवण्यासाठी मार्च आणि एप्रिल हे खास महिने आहेत. दरवर्षी या महिन्यांदरम्यान स्मारकविधीला आपण लोकांना आमंत्रण देण्याच्या मोहिमेत आनंदाने सहभाग घेतो. शिवाय, या महिन्यांत बरेच जण आपली सेवा वाढवतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रचारकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. स्मारकविधीला जे उपस्थित राहतात आणि जे आवड दाखवतात त्यांची परत भेट घेऊन आपण त्यांना खास भाषणाला उपस्थित राहण्यास प्रोत्साहन देतो. तर मग, आपण साहाय्यक पायनियरींग करण्याच्या संधीचा फायदा घेण्यास प्रवृत्त होत नाही का?—लूक ६:४५.