तुम्ही नियमित रीत्या सूचनाफलक पाहता का?
वडील, साहाय्यक सेवक आणि ज्यांच्याकडे मंडळीतील जबाबदाऱ्या आहेत असे इतर जण त्यांचे मंडळीत केव्हा भाग आहेत हे पाहण्यासाठी नियमित रीत्या सूचनाफलक पाहतात. खरेतर, मंडळीतील सर्वांनाच तेथे महत्त्वाची माहिती मिळते. तुम्हाला माहीत आहे का तुमची सभागृह स्वच्छ करण्याची वेळ कधी आहे? विभागीय पर्यवेक्षक किंवा शाखा कार्यालयाने मंडळीला पत्रे पाठवली आहेत का? तुम्हाला या आठवडी होणाऱ्या जाहीर भाषणाचा विषय माहीत आहे का जेणेकरून तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला बोलवू शकाल? मंडळीच्या आराखड्यात किंवा तुमच्या क्षेत्र सेवेच्या गटात काही फेरबदल झाले आहेत का? मंडळीत आजकाल अशा घोषणा केल्या जात नाहीत आणि वडिलांनाही प्रत्येक प्रचारकाला जाऊन सांगणे शक्य नाही. म्हणून आपण सर्वांनी सूचनाफलक नियमित रीत्या पाहिला पाहिजे. जर आपण वरच्यावर सूचनाफलक पाहिला तर सर्व गोष्टी “शिस्तवार व व्यवस्थितपणे” होऊ शकतील.—१ करिंथ. १४:४०.