ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२९ एप्रिल २०१३ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.
१. मार्क १०:६-९ मध्ये येशूने विवाहाबद्दल कोणत्या एका गंभीर गोष्टीची आठवण करून दिली? [मार्च ४, टेहळणी बुरूज ०८ २/१५ पृ. ३० परि. ८]
२. जिवाभावाने यहोवाची सेवा करणे म्हणजे नेमके काय? (मार्क १२:३०) [मार्च ४, टेहळणी बुरूज ९७ १०/१५ पृ. १३ परि. ४]
३. मार्क १३:८ मध्ये उल्लेखण्यात आलेल्या वेदना कशास सूचित करतात? [मार्च ११, टेहळणी बुरूज ०८ ३/१५ पृ. १२ परि. २]
४. मरीयेच्या बाळाची रचना करण्याकरता तिच्या शरीरातील स्त्री बीजाचा वापर करण्यात आला का? (लूक १:३५) [मार्च १८, टेहळणी बुरूज ०८ ३/१५ पृ. ३० परि. ५]
५. आपल्या सचोटीची परीक्षा घेण्यासाठी सैतान योग्य संधीची वाट पाहतो, ही गोष्ट आपल्याला माहीत असल्याने आपण काय करणे गरजेचे आहे? (लूक ४:१३) [मार्च २५, टेहळणी बुरूज ११ १/१५ पृ. २३ परि. १०]
६. लूक ६:२७, २८ मधील येशूचे शब्द आपण कसे लागू करू शकतो? [मार्च २५, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृ. ८ परि. ४]
७. येशू खंडणीची किंमत देण्याआधीच एका स्त्रीला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे का म्हणू शकला? (लूक ७:३७, ४८) [एप्रि. १, टेहळणी बुरूज १० ८/१५ पृष्ठे ६-७]
८. ख्रिस्ताचे अनुयायी आपल्या नातलगांचा “द्वेष” करतात ते कोणत्या अर्थाने? (लूक १४:२६) [एप्रि. १५, टेहळणी बुरूज ०८ ३/१५ पृ. ३२ परि. १]
९. “सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील” तेव्हा मानवांवर याचा काय परिणाम होईल? (लूक २१:२५) [एप्रि. २२, टेहळणी बुरूज ९७ ४/१ पृ. १५ परि. ८-९]
१०. तीन तासांचा अंधार सूर्य ग्रहणामुळे पडला होता का? (लूक २३:४४) [एप्रि. २९, टेहळणी बुरूज ०८ ३/१५ पृ. ३२ परि. ४]