एप्रिल १ च्या सप्ताहाचा आराखडा
१ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ७ परि. २१-२५, परिशिष्ट पृ. २१३-२१५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लूक ७-९ (१० मि.)
क्र. १: लूक ७:१८-३५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पेन्टेकॉस्ट ३३च्या दिवशी कोणत्या नवीन राष्ट्राचा जन्म झाला आणि त्याचा काय उद्देश आहे?—गलती. ६:१६; १ पेत्र २:९ (५ मि.)
क्र. ३: इस्राएल लोक राजाची मागणी करतात—बायबलचा संदेश पृ. १२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: एप्रिल महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रात लोकांना आवडतील असे एप्रिल ते जून टेहळणी बुरूज अंकातील काही लेख एक-दोन मिनिटांत दाखवा. त्यानंतर, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: “नियमन मंडळाकडून पत्र.” चर्चा. देशभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याविषयी कोणती गोष्ट आवडली ते श्रोत्यांना विचारा.
गीत २८ आणि प्रार्थना