घोषणा
◼ साहित्य सादरता फेब्रुवारी: पुढील ३२ पानांचे कोणतेही एखादे माहितीपत्रक सादर करा. समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे?, बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? आणि जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करू शकता, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेता देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करू शकता. मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेता देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मे आणि जून: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा - कोण आहे?, शांतीदायक नवीन जगातील जीवन, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे?, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि या जगाचा बचाव होईल का? घरमालकाला आवड असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा.
◼ स्मारकविधीसाठी नवीन भाषण तयार करण्यात आले आहे आणि २०१३ पासून स्मारकविधीचे भाषण देणाऱ्या सर्व बांधवांनी याचा उपयोग करावा. या वर्षी या भाषणाचा विषय आहे: “येशूने आपल्यासाठी जे केले त्याची नेहमी कदर बाळगा!”
◼ २०१३ मधील स्मारकविधीसाठी खास भाषणाचा विषय आहे: “मृत्यू होतो तेव्हा सगळेच संपते का?”