नमुना सादरीकरण
स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका मोहीम
बायबल आधारित संदेशाप्रती घरमालकाची आवड लक्षात घेऊन तुम्ही बोलू शकता: “नमस्ते, संपूर्ण जगभरात २६ मार्च रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या वार्षिक कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. ही येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची तारीख आहे. या प्रसंगी एक विनामूल्य बायबल आधारित भाषण सादर केले जाईल ज्यात येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला काय आशीर्वाद मिळणार आहेत याबद्दलची माहिती सांगितली जाईल. आपल्या भागात होणाऱ्या या कार्यक्रमाची वेळ व ठिकाण आमंत्रण पत्रिकेत दिले आहे.”