फेब्रुवारी २५ च्या सप्ताहाचा आराखडा
२५ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ६ परि. १-६, परिशिष्ट पृ. २०८-२११ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: मार्क ५-८ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: “तुम्ही थांबवलेच पाहिजे का?” चर्चा.
१० मि: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०१३ पुस्तिकेतून लाभ मिळवणे. चर्चा. पृष्ठे ३-४ वर असलेल्या वार्षिक वचनावर आणि पृष्ठ ५ वरील “या पुस्तिकेचा वापर कसा कराल?” यात दिलेल्या माहितीवर थोडक्यात चर्चा करा. नंतर श्रोत्यांना विचारा की त्यांनी दैनिक वचन वाचण्यासाठी कोणती वेळ ठरवली आहे आणि यामुळे त्यांना कोणते फायदे मिळाले आहेत. दररोज दैनिक वचन वाचण्याचे सर्वांना उत्तेजन देऊन भागाची समाप्ती करा.
१५ मि: “अपार्टमेंटमध्ये साक्षकार्य करून ‘उत्तम साक्ष द्या.’” परिच्छेद १ ते ११ पर्यंत मंडळीतील वडिलांद्वारे प्रश्न व उत्तरे. माहितीत दिलेल्या सूचनांचा उपयोग स्थानीय क्षेत्रात करण्याचा प्रयत्न करा.
गीत ४४ आणि प्रार्थना