फेब्रुवारी १८ च्या सप्ताहाचा आराखडा
१८ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ५ परि. २१, २२, परिशिष्ट पृ. २०६-२०८ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: मार्क १-४ (१० मि.)
क्र. १: मार्क २:१८-३:६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: ईयोब देवाशी एकनिष्ठ राहतो—बायबलचा संदेश पृ. ९ (५ मि.)
क्र. ३: १ करिंथकर ७:२९-३१ या वचनाद्वारे पौल आपल्याला काय सल्ला देतो? (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: यहोवा आपल्याला सेवाकार्यात सामर्थ्य देतो. (फिलिप्पै. ४:१३) अशा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांची तब्येत चांगली नसूनही ते सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेतात. त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी आहेत? अधून-मधून निराशा येत असली तरी, कायमच त्या अवस्थेत न राहण्यास त्यांना कशी मदत मिळाली आहे? मंडळीद्वारे त्यांना व्यावहारिक मदत कशी मिळाली आहे? सेवाकार्यात नियमित रीत्या सहभागी झाल्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
१५ मि: “स्मारकविधी जाहिरात मोहीम १ मार्च पासून सुरू.” प्रश्न व उत्तरे. मंडळीतील सर्व प्रचारकांना स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेची एकएक प्रत वाटा आणि त्यातील मुद्द्यांवर चर्चा करा. परिच्छेद २ वर चर्चा करताना, स्थानीय क्षेत्र उरकण्यासाठी काय योजना केल्या आहेत ते सेवा पर्यवेक्षकाला विचारा. परिच्छेद ३ वर चर्चा करताना नमुना सादरीकरणाचा वापर करून आमंत्रण पत्रिका कशी दिली जाऊ शकते याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ८ आणि प्रार्थना