वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१३ पृ. १
  • तुम्ही सहायक पायनियरिंग कराल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही सहायक पायनियरिंग कराल का?
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • सेवा वाढवण्याची आत्तापासूनच योजना करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • स्मारकविधीच्या काळात तुमचा आनंद द्विगुणित करा!
    आमची राज्य सेवा—२०१४
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km २/१३ पृ. १

तुम्ही सहायक पायनियरिंग कराल का?

१. सेवाकार्य वाढवण्यासाठी स्मारकविधीचा काळ उत्तम का आहे?

१ सेवाकार्य वाढवण्यासाठी स्मारकविधीचा काळ आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. या प्रसंगी आपण यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राची खंडणी देऊन त्याचे अफाट प्रेम दाखवले त्यावर मनन करू शकतो. (योहा. ३:१६) यामुळे आपल्या मनात कृतज्ञतेची भावना वाढते; इतरांना यहोवाबद्दल आणि तो मानवजातीसाठी काय करत आहे याबद्दल सांगण्यास आपण प्रवृत्त होतो. (यश. १२:४, ५; लूक ६:४५) त्याचबरोबर आपल्यासोबत स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या ओळखीच्या लोकांना आणि क्षेत्रातील लोकांना आमंत्रण पत्रिका वाटण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळते. त्यानंतर जे स्मारकविधीला उपस्थित राहतात त्यांच्या मनात यहोवाबद्दल आवड निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. तुम्ही मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांदरम्यान सहायक पायनियरिंग करण्याद्वारे आपले सेवाकार्य वाढवू शकाल का?

२. सहायक पायनियरिंग करण्यासाठी खासकरून मार्च महिना चांगला का आहे?

२ मार्च हा खास महिना बनवा: सहायक पायनियरिंगसाठी खासकरून मार्च महिना चांगला ठरू शकतो. जे सहायक पायनियरिंग करू इच्छितात ते ३० किंवा ५० तास भरू शकतात. तुमच्या मंडळीत मार्च महिन्यात विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर नियमित आणि खास पायनियरांबरोबर होणाऱ्‍या संपूर्ण सभेत सहायक पायनियर उपस्थित राहू शकतात. २६ मार्च मंगळवार या तारखेला होणाऱ्‍या स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांचे वाटप १ मार्च पासून सुरू होणार आहे; ही मोहीम मागच्या वर्षाच्या मानाने जास्त दिवस चालवली जाणार आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यात पाच पूर्ण आठवडे आहेत. तर या सर्व गोष्टींना विचारात घेता तुम्ही मार्च महिना खास बनवू शकाल का?

३. सेवाकार्य वाढवण्यासाठी आपण कोणत्या योजना करू शकतो?

३ आत्ताच योजना करा: तुमच्या दैनंदिन कार्यावर आणि पायनियरिंग करण्यासाठी तुम्ही कोणकोणते फेरबदल करू शकता यावर विचार करण्याची आता वेळ आहे. यात कुटुंबातील प्रत्येकाने सहकार्य करणे महत्त्वाचे आहे; तर कौटुंबिक उपासना संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुटुंब मिळून ठरवू शकता की तुमचे काय ध्येय आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही नियोजन करू शकता. (नीति. १५:२२) तुमच्याने सहायक पायनियरिंग करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. ज्या दिवशी तुम्ही बाहेर जाल त्या दिवशी सेवाकार्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आराखड्यात काही फेरबदल करू शकता का? आठवड्यातल्या आणखी एका दिवशी तुम्ही सेवाकार्यात जाऊ शकाल का?

४. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सेवाकार्य वाढवल्याने आपल्याला कोणते चांगले परिणाम मिळतील?

४ मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आपण आपले सेवाकार्य वाढवले तर, यहोवाची सेवा केल्यामुळे व लोकांपर्यंत संदेश पोहचवल्यामुळे मिळणारा आनंद व समाधान द्विगुणित होईल. (योहा. ४:३४; प्रे. कृत्ये २०:३५) त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आपल्या निःस्वार्थ प्रयत्नांमुळे यहोवाला खूप आनंद होईल.—नीति. २७:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा