वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. १
  • परिश्रम करून समाधान मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • परिश्रम करून समाधान मिळवा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • “धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • ‘विपुल फळ देत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘वाढवणारा देवच आहे’!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • हिंमत हारू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. १

परिश्रम करून समाधान मिळवा

१. कशामुळे आपण सेवा कार्यातील उत्साह गमावू शकतो?

१ मानवाला अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की तो “श्रम करून आपल्या जिवास सुख” देऊ शकतो. (उप. २:२४) पण, आपल्या सेवा कार्यात चांगले प्रतिफळ मिळत नाही असे आपल्याला वाटते तेव्हा निराश होऊन आपण आपला आनंद आणि उत्साह गमावू शकतो. तेव्हा, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास कशामुळे  मदत होऊ शकते?

२. सेवाकार्याबाबत आपण योग्य अपेक्षा का बाळगल्या पाहिजेत?

२ योग्य अपेक्षा ठेवा: येशूच्या शिकवणींना खूप कमी लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तरीही त्याने त्याचे सेवाकार्य यशस्वी रीत्या पार पाडले यात काही शंका नाही. (योहा. १७:४) येशूच्या बी पेरणाऱ्‍याच्या दाखल्यामध्ये त्याने सांगितले होते, की असे खूप कमी लोक असतील जे राज्याच्या संदेशाचे बीज आपल्या मनात रुजवतील. (मत्त. १३:३-८, १८-२२) तरीही, आपल्या कठीण परिश्रमांमुळे बरेच काही साध्य होऊ शकते.

३. सेवाकार्यात आपल्याला हवी तशी प्रतिक्रिया मिळाली नाही तरी आपण आध्यात्मिक फळ कसे उत्पन्‍न करू शकतो?

३ आपण आध्यात्मिक फळ कसे उत्पन्‍न करू शकतो? येशूच्या दाखल्यात सांगितल्याप्रमाणे जो राज्याचा संदेश स्वीकारतो तो “फळ देतोच देतो.” (मत्त. १३:२३) गव्हाला अंकुर फुटून पक्व होतो तेव्हा तो गव्हाच्या नवीन छोट्या छोट्या कांड्यांच्या रूपात नव्हे तर नव्या दाण्यांच्या अर्थात बियांच्या रूपात फळ उत्पन्‍न करतो. त्याच प्रकारे एक यशस्वी ख्रिस्ती व्यक्‍तीदेखील नेहमीच नव्या शिष्यांच्या रूपात फळ उत्पन्‍न करत नाही, तर राज्याचा प्रचार करण्याद्वारे सतत बी पेरत राहते. त्यामुळे लोकांचा काहीही प्रतिसाद असला तरीही आपण या चांगल्या कामातून समाधान मिळवू शकतो. त्याचबरोबर आपण यहोवाच्या नावाचे पवित्रीकरणही करतो. (यश. ४३:१०-१२; मत्त. ६:९) आपल्याला देवाचे सहकर्मी होण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. (१ करिंथ. ३:९) आणि अशा प्रकारचे “ओठांचे फळ” यहोवाला आनंदित करते.—इब्री १३:१५, १६.

४. आपल्या सेवाकार्यामुळे आपल्या नकळत कोणते परिणाम उत्पन्‍न होऊ शकतात?

४ याशिवाय, आपण जे कठीण परिश्रम करतो त्यातून मिळणारे चांगले परिणाम कदाचित आपल्याला दिसत नसतील. जसे की काहींनी येशूचा संदेश ऐकला असेल, पण येशूचे पृथ्वीवरील सेवाकार्य संपेपर्यंत ते कदाचित त्याचे शिष्य बनले नसतील. त्याचप्रमाणे, आपण राज्याचे बीज लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कदाचित ते लगेच मूळ धरून वाढणार नाही, पण आपल्या नकळत नंतर कदाचित त्यांनी सत्य स्वीकारले असेल. खरेच, आपण जे सेवाकार्य करतो त्याचे चांगले प्रतिफळ आपल्याला मिळते. त्यामुळे, आपण आध्यात्मिक रीत्या “विपुल फळ” देत राहू या आणि येशूचे शिष्य आहोत हे सिद्ध करत राहू या.—योहा. १५:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा