डिसेंबर ३ च्या सप्ताहाचा आराखडा
३ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. २ परि. १८-२०, पृ. १९९-२०१ वरील परिशिष्ट (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: नहूम १-हबक्कूक ३ (१० मि.)
क्र. १: हबक्कूक २:१-१४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सत्य आत्मविश्वासाने का सांगितले पाहिजे?—२ तीम. १:७, ८ (५ मि.)
क्र. ३: कुटुंबात मस्तकपदाबद्दल उचित दृष्टिकोन—कुटुंब पृ. १८५ परि. ६, ७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: डिसेंबर महिन्यात पत्रिका सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. कौटुंबिक जीवनाचा आनंद लूटा ही पत्रिका आपल्या क्षेत्रात का परिणामकारक ठरू शकेल ते ३० ते ६० सेकंदात सांगा. मंडळीत ज्या पत्रिकांचा साठा आहे आणि क्षेत्र सेवेत लोकांना आवडतील अशा कोणत्याही पत्रिकांची नावे सांगा. पत्रिका सादर करताना घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कोणते शास्त्रवचन वाचू शकतो याबद्दल श्रोत्यांना विचारा. पत्रिकेचे सादरीकरण कसे केले जाऊ शकते याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: पत्रिका सादर करताना आलेले अनुभव. सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. नोव्हेंबर महिन्यात पत्रिका सादर करताना श्रोत्यांना कोणते चांगले अनुभव आले ते विचारा. घरोघरच्या सेवा कार्यात पत्रिकेचे सादरीकरण कसे करण्यात आले याचे दोन प्रचारकांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा.
गीत ४४ आणि प्रार्थना