ऑगस्ट १३ च्या सप्ताहाचा आराखडा
१३ ऑगस्टने सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११७, ११८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहेज्केल २८-३१ (१० मि.)
क्र. १: यहेज्केल २८:१७-२६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: येशू ख्रिस्ताविषयी प्रचलित असलेली कोणती मते खरी आहेत व कोणती खरी नाहीत? (५ मि.)
क्र. ३: घटस्फोटासाठी बायबलचा आधार—कुटुंब पृ. १५८ परि. १४–पृ. १५९ परि. १६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: पुनर्भेटीसाठी घरमालकाच्या मनाची तयारी करा. पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा: (१) घरमालकाची पुन्हा भेट घेता यावी म्हणून पहिल्याच भेटीत त्याच्या मनाची तयारी करणे का गरजेचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो? (२) घरमालकाची उत्सुकता वाढेल असा कोणता प्रश्न आपण पहिल्या भेटीत विचारू शकतो, ज्याचे उत्तर पुनर्भेट घेताना आपल्याला देता येईल? (३) पुनर्भेट कधी घ्यायची याची घरमालकाशी बोलून एक निश्चित वेळ ठरवणे आणि शक्य असल्यास, घरमालकाचा फोन नंबर किंवा ई-मेल ॲड्रेस घेणे उपयुक्त का ठरेल? (४) आपण लवकरात लवकर, शक्यतो काही दिवसांतच पुनर्भेट घेण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? (५) पहिल्या भेटीनंतर आपण घरमालकाविषयी कोणती माहिती लिहून घेतली पाहिजे?
१० मि: पूर्णवेळची सेवा करणाऱ्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. पूर्णवेळची सेवा करण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीने प्रोत्साहन दिले? त्यांच्यासमोर कोणते अडथळे आले, आणि तरीही त्यांना पूर्णवेळच्या सेवाकार्यात टिकून कसे राहता आले? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? येत्या सेवा वर्षादरम्यान, प्रचारकांना सामान्य पायनियरिंग करण्याचे प्रोत्साहन द्या.
१० मि: “आपल्या विवेकाचे रक्षण करा.” प्रश्न व उत्तरे. खास संमेलन दिनाची तारीख माहीत असल्यास ती श्रोत्यांना सांगा.
गीत ३२ आणि प्रार्थना