वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१२ पृ. १
  • आपल्या विवेकाचे रक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या विवेकाचे रक्षण करा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला चांगला विवेक कसा बाळगता येईल?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • तुमचा विवेक भरवशालायक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • तुमचा विवेक—त्यास कसे प्रशिक्षित करावे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ८/१२ पृ. १

आपल्या विवेकाचे रक्षण करा

१. २०१३ या सेवा वर्षातील खास संमेलन दिनाचा विषय काय आहे, आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे?

१ आपल्यासमोर दररोज असे अनेक प्रसंग येतात ज्यांमुळे आपल्या विवेकाविरुद्ध कार्य करण्याचे प्रलोभन आपल्यावर येऊ शकते. म्हणूनच, १ सप्टेंबर २०१२ पासून सुरू होणाऱ्‍या सेवा वर्षातील खास संमेलन दिन कार्यक्रमासाठी “आपल्या विवेकाचे रक्षण करा,” हा विषय निवडण्यात आला आहे. (१ तीम. १:१९) विवेक ही आपल्याला देवाकडून मिळालेली एक अमूल्य देणगी आहे आणि या देणगीचा आपण प्रत्येक जण कशा प्रकारे उपयोग करतो याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास हा कार्यक्रम आपल्याला मदत करेल.

२. कोणत्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे या कार्यक्रमात देण्यात येतील?

२ कोणते मुद्दे सादर केले जातील? या कार्यक्रमात विवेकासंबंधी सात महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात येतील:

• कोणत्या गोष्टी आपल्या विवेकाला घातक ठरू शकतात?

• आपण आपल्या विवेकाला वळण कसे लावू शकतो?

• सर्व लोकांच्या रक्‍तदोषातून शुद्ध राहणे कसे शक्य आहे?

• बायबल तत्त्वांबद्दल आपण जो विचार करतो आणि ज्या प्रकारे ती तत्त्वे आपल्या जीवनात लागू करतो त्यावरून आपण काय दाखवून देतो?

• विवेकाशी संबंधित गोष्टींच्या बाबतीत आपण दुसऱ्‍यांना दुखावण्याचे कसे टाळू शकतो?

• तरुणांनो, तुमच्यावर बायबल तत्त्वांसंबंधी तडजोड करण्याचा दबाव येतो तेव्हा त्याचा सामना तुम्ही कसा करू शकता?

• देवाने मार्गदर्शित केलेल्या विवेकानुसार जे लोक आपले जीवन जगतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

३. या कार्यक्रमाचा आपल्याला कसा फायदा होईल?

३ सैतान आपल्यावर आपल्या विवेकाविरुद्ध कार्य करण्याचे प्रलोभन आणण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतो; पण यहोवाच्या मदतीने आपण या प्रलोभनांचा प्रतिकार करू शकतो. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे आपल्याला असे सांगतो: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यश. ३०:२१) यहोवा आपल्याला मार्गदर्शन देतो याचा एक पुरावा म्हणजे खास संमेलन दिन कार्यक्रम. तेव्हा, या कार्यक्रमाचा एकही भाग चुकवू नका. लक्ष देऊन कार्यक्रम ऐका आणि त्यातील माहितीचा व्यक्‍तिगत रीत्या कसा उपयोग केला जाऊ शकतो याचा विचार करा. कुटुंब मिळून या कार्यक्रमाची चर्चा करा. कार्यक्रमादरम्यान जे मार्गदर्शन दिले जाईल त्याचा अवलंब केल्याने आपल्याला “आपली विवेकबुद्धी शुद्ध” राखण्यास आणि सैतानाच्या जगातील क्षणभंगुर सुखाचा मोह टाळण्यास मदत मिळू शकते.—१ पेत्र ३:१६, ईझी टू रीड भाषांतर.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा