घोषणा
◼ साहित्य सादरीकरण जून: बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करून पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकाकडे हे पुस्तक असेल, पण बायबल अभ्यास करण्यास तो तयार नसेल, तर त्याच्या आवडीच्या विषयावरील एखादे जुने नियतकालिक किंवा माहितीपत्रक त्याला दिले जाऊ शकते. जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करा. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्तीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्तीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.