वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१२ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km ६/१२ पृ. २

प्रश्‍न पेटी

◼ आपल्या मृत्यूनंतर आपली सगळी अथवा काही मालमत्ता यहोवाच्या संघटनेला मिळावी अशी इच्छा असल्यास आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

मानवांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मालमत्तेवर त्यांचे काहीच नियंत्रण राहत नाही. (उप. ९:५, ६) म्हणूनच, अनेक जण आपल्या मालमत्तेची वाटणी कशी करावी हे सांगणारे मृत्युपत्र आधीच तयार करतात किंवा ट्रस्ट बनवतात. (२ राजे २०:१) या अधिकृत दस्तऐवजात, आपला ट्रस्टी म्हणून किंवा आपल्या मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेची वाटणी करण्यासाठी आपला मृत्युपत्र-व्यवस्थापक म्हणून काम करण्यासाठी आपण कोणाची निवड केली आहे हेदेखील सहसा सूचित केलेले असते. एका व्यक्‍तीने अशा प्रकारचे कोणतेही दस्तऐवज तयार केलेले नसेल, तर बऱ्‍याचदा मृत व्यक्‍तीच्या मालमत्तेचे काय केले जावे हे त्या-त्या देशांतील अधिकारी ठरवतात. त्यामुळे, आपल्या मालमत्तेसंबंधी आपल्या काही विशिष्ट इच्छा असल्यास जसे की, आपल्या मृत्यूनंतर आपली सगळी अथवा काही मालमत्ता यहोवाच्या संघटनेला मिळावी अशी आपली इच्छा असल्यास, तसे अधिकृत दस्तऐवज तयार करणे व त्यासाठी एका मृत्युपत्र-व्यवस्थापकाची किंवा ट्रस्टीची काळजीपूर्वक निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मृत्युपत्र-व्यवस्थापकाची किंवा ट्रस्टीची जबाबदारी फार गंभीरस्वरूपाची असते. मालमत्ता किंवा पैसा किती आहे हे विचारात घेऊन तो एकत्र करण्यासाठी व त्याची वाटणी करण्यासाठी त्याला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील व त्यात त्याचा बराच वेळही खर्च होऊ शकतो. याशिवाय, अशा गोष्टींच्या बाबतीत सहसा सरकारी अधिकाऱ्‍यांच्या काही मार्गदर्शक सूचना असतात ज्यांचे पालन करणे गरजेचे असते. ख्रिस्ती मंडळीचा सदस्य असलेला कोणीही एक चांगला मृत्युपत्र-व्यवस्थापक किंवा ट्रस्टी होऊ शकतो असे नाही. या कामासाठी आपण ज्या व्यक्‍तीची निवड करू ती योग्य, भरवशालायक आणि आपल्या इच्छा विचारात घेऊन काम करणारी असावी.

मृत्युपत्र-व्यवस्थापक किंवा ट्रस्टी बनण्यासाठी विचारल्यास काय करावे: तुम्हाला कोणी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेची कायदेशीर देखभाल करण्यास किंवा त्याची वाटणी करण्यास सांगितले, तर सर्वात प्रथम त्या कामात तुमचा किती वेळ व श्रम खर्च होईल याचा अंदाज बांधा आणि तुम्ही ती जबाबदारी पेलू शकाल की नाही याचा प्रार्थनापूर्वक विचार करा. (लूक १४:२८-३२) त्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या मृत्यूपत्रानुसार ज्या-ज्या लोकांचा तिच्या मालमत्तेत हिस्सा आहे त्या सर्वांना तुम्हाला कळवावे लागेल. त्यानंतर, कायद्यानुसार आणि मृत व्यक्‍तीच्या मृत्युपत्रात किंवा ट्रस्टमध्ये सांगितल्यानुसार तुम्हाला मालमत्तेची वाटणी करावी लागेल. ट्रस्टीला किंवा मृत्युपत्र-व्यवस्थापकाला याची जाणीव असली पाहिजे, की मृत व्यक्‍तीची मालमत्ता कमी असो अथवा जास्त, मृत्युपत्रात सांगितल्यानुसारच तिच्या मालमत्तेची वाटणी करण्यात यावी. मृत्युपत्रात किंवा ट्रस्टमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिकृत संस्थेसाठी काही मालमत्ता राखून ठेवली असेल तर तिच्यावर सर्वस्वी यहोवाच्या संघटनेचा हक्क असेल.—लूक १६:१०; २१:१-४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा