एप्रिल २३ च्या सप्ताहाचा आराखडा
२३ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ९३, ९४ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया २९-३१ (१० मि.)
क्र. १: यिर्मया ३१:१५-२६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: ख्रिश्चनांनी दर आठवडी शब्बाथ पाळावा अशी देव अपेक्षा करतो का? (५ मि.)
क्र. ३: तुमचा धर्म तुमच्या पालकांचा नसल्यास?—कुटुंब पृ. १३४ परि. १६-पृ. १३६ परि. १९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: मे महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रात लोकांना आवडतील असे टेहळणी बुरूज, एप्रिल – जून नियतकालिकातील काही लेख एक-दोन मिनिटांत दाखवा. त्यानंतर, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: “नियमन मंडळाकडून पत्र.” आमची राज्य सेवा, मार्च २०१२ मधील पत्राविषयी सुरुवातीला भाषणाच्या रूपात माहिती द्या. मग, आमची राज्य सेवा, फेब्रुवारी २०१२ मधील वार्षिक अहवालात, श्रोत्यांना कोणते प्रोत्साहनदायक पैलू आवडले ते विचारा.
गीत ३३ आणि प्रार्थना