वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१२ पृ. १
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
    आमची राज्य सेवा—२००७
  • आपली कृतज्ञता व्यक्‍त करू या १७ एप्रिल रोजी स्मारकविधी साजरा केला जाईल
    आमची राज्य सेवा—२०११
  • स्मारकविधी पाळण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनतीवर यहोवा आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • आनंदी मनाने स्मारकविधीची तयारी करा
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ३/१२ पृ. १

“माझ्या स्मरणार्थ हे करा”

५ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा स्मारकविधी

१. स्मारकविधी साजरा करणे ख्रिश्‍चनांसाठी इतका महत्त्वाचा का आहे?

१ “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) अशा प्रकारे येशूने त्याच्या अनुयायांना त्याच्या बलिदानरूपी मृत्यूचे स्मरण करण्याची आज्ञा दिली. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. त्यामुळे या वार्षिक स्मारकविधीच्या तुलनेत दुसरा कोणताही दिवस ख्रिश्‍चनांसाठी इतका महत्त्वाचा किंवा मोलाचा नाही. या वर्षाच्या स्मारकविधीची ५ एप्रिल ही तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे आपण यहोवाला कृतज्ञता कशी दाखवू शकतो?—कलस्सै. ३:१५.

२. स्मारकविधीबद्दलची कदर आपण अभ्यास आणि मनन करून कशी दाखवू शकतो?

२ तयारी: आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टींची तयारी सहसा आपण आधी करतो. संपूर्ण कुटुंब मिळून आपण येशूच्या पृथ्वीवरील शेवटच्या दिवसात घडलेल्या घटनांची चर्चा व मनन करून आपल्या मनाची तयारी करू शकतो. (एज्रा ७:१०, पं.र.भा.) कॅलेंडर आणि शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा यात शास्त्रवचनांची संक्षिप्त यादी दिली आहे. पण इंग्रजीतील १ फेब्रुवारी २०११ टेहळणी बुरूज पृष्ठे २३-२४ वर सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकातील अध्यायांशी जुळणारी शास्त्रवचनांची अधिक सविस्तर यादी देण्यात आली आहे.

३. आपले सेवाकार्य वाढवून आपण स्मारकविधीबद्दल कदर कशी दाखवू शकतो?

३ प्रचार: प्रचार कार्यात होता होईल तितका भाग घेऊनही आपण आपली कदर दाखवू शकतो. (लूक ६:४५) स्मारकविधीला इतरांना आमंत्रित करण्याची एक जगव्याप्त मोहीम शनिवार, १७ मार्च पासून सुरू होणार आहे. अधिक वेळ सेवा करण्यासाठी, जसे की साहाय्यक पायनियरींग करता यावी म्हणून तुम्ही तुमच्या आराखड्यात फेरबदल करू शकता का? याविषयीची चर्चा तुम्ही तुमच्या पुढील कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी करू शकता.

४. स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात?

४ दरवर्षी होणाऱ्‍या स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने आपला खरोखरच किती फायदा होतो! यहोवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे आपल्यासाठी खंडणी बलिदान देऊन जी उदारता दाखवली आहे त्यावर मनन केल्याने आपला आनंद द्विगुणित होतो व यहोवावरील आपले प्रेमदेखील वाढते. (योहा. ३:१६; १ योहा. ४:९, १०) यामुळे आपण स्वतःकरता जगत नाही. (२ करिंथ. ५:१४, १५) तसेच लोकांमध्ये यहोवाची स्तुती करण्यासही आपण प्रवृत्त होतो. (स्तो. १०२:१९-२१) यहोवाची कृतज्ञता बाळगणारे सेवक, ५ एप्रिल रोजी “प्रभूच्या मरणाची” घोषणा करण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहात आहेत.—१ करिंथ. ११:२६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा