स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांची वाटप मोहीम—मार्च १७!
१. मार्च १७ पासून कोणत्या मोहिमेची सुरुवात होणार आहे?
१ दर वर्षी आपण स्मारकविधी साजरा करून येशूच्या मृत्यूची घोषणा करतो. (१ करिंथ. ११:२६) इतरांनीही आपल्यासोबत या स्मारकाला उपस्थित राहावे आणि यहोवाने पुरवलेल्या खंडणीच्या प्रेमळ देणगीबद्दल ऐकावे अशी आपली इच्छा असते. (योहा. ३:१६) या वर्षी शनिवार १७ मार्चपासून आपण स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांची वाटप मोहीम सुरू करणार आहोत. या मोहिमेत पूर्ण सहभाग घेण्याची तुम्ही वाट पाहत आहात का?
२. पत्रिका सादर करताना आपण काय म्हणू शकतो आणि कोणती खबरदारी बाळगू शकतो?
२ पत्रिका देताना तुम्ही काय म्हणू शकता? तुम्ही थोडक्यात बोलून पत्रिका देऊ शकता. तुम्ही म्हणू शकता: “नमस्ते. आज आम्ही एका महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. हा वार्षिक सोहळा ५ एप्रिल रोजी सबंध जगभर साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या वेळी एक भाषण दिलं जाईल. आणि त्या भाषणात, येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले व तो सध्या काय करत आहे हे समजावून सांगितले जाईल. हा सोहळा कुठे व किती वाजता साजरा होईल, ते या आमंत्रण पत्रिकेवर सांगितले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.” घरमालक ख्रिस्ती नसल्यास, पत्रिका देण्याआधी तो ऐकण्यास इच्छुक आहे की नाही हे तुम्हाला पाहावे लागेल. शनिवार-रविवारी आमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेत भाग घेताना उचित असते तेव्हा आपण नियतकालिके देखील सादर करू शकतो.
३. होता होईल तितक्या लोकांना आपण आमंत्रण पत्रिका कशी देऊ शकतो?
३ होता होईल तितक्यांना आमंत्रण द्या: होता होईल तितक्या लोकांना आमंत्रण देण्याचे आपले ध्येय आहे. बायबल विद्यार्थ्यांना, तुम्ही ज्यांची पुनर्भेट घेता त्यांना, नातेवाईकांना, सोबत काम करणाऱ्यांना, शाळासोबत्यांना, शेजाऱ्यांना, व इतर ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्या. क्षेत्र कसे पूर्ण करायचे त्याबद्दल तुमच्या मंडळीतील वडील मार्गदर्शन पुरवतील; ते क्षेत्रातील अशा लोकांच्या भावनांचाही विचार करतील जे संवेदनशील आहेत. स्मारकविधीला लोकांना आमंत्रित करण्याच्या आपल्या वार्षिक मोहिमेचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळाले आहेत. गेल्या वर्षी एक स्त्री सभागृहात आली तेव्हा अटेन्डंटने तिला, ज्यांनी तुम्हाला आमंत्रण पत्रिका दिली होती त्यांना मी शोधून काढतो, असे म्हटले. पण यावर ती स्त्री म्हणाली, मी येथे कोणालाच ओळखत नाही. सकाळीच कोणीतरी माझ्या घरी आले व त्यांनी ही आमंत्रण पत्रिका मला दिली.
४. मोहिमेत आवेशाने सहभाग घेण्याची कोणकोणती कारणे आहेत?
४ तुम्ही ज्यांना आमंत्रण पत्रिका दिली आहे त्यांपैकी काही जण कदाचित स्मारकविधीला उपस्थित राहतील. आणि जरी काही उपस्थित राहिले नाहीत तरी तुम्ही केलेले मनःपूर्वक प्रयत्न वाया जाणार नाहीत; तुम्ही त्यांना साक्ष दिलेली आहे. तुम्ही देत असलेल्या आमंत्रण पत्रिकेतून ही घोषणा केली जाते, की येशू आता एक शक्तिशाली राजा आहे. या मोहिमेत तुम्ही जेव्हा आवेशाने भाग घेता तेव्हा तुम्ही मनापासून खंडणीच्या देणगीची कदर करता हे तुमच्या क्षेत्रातील लोकांना, तुमच्या सोबतच्या भाऊबहिणींना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाला दिसून येईल.—कलस्सै. ३:१५.