फेब्रुवारी २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७८, ७९ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ५८-६२ (१० मि.)
क्र. १: यशया ६१:१-११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: समर्पणातून प्रेम व विश्वास व्यक्त होतो असे का म्हणता येते? (५ मि.)
क्र. ३: कुटुंबातील एक सदस्य आजारी असतो तेव्हा मुलांना मदत करणे—कुटुंब पृ. १२३ परि. १६-१८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. मार्च महिन्याची साहित्य सादरता सांगा आणि ते सादर करण्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. स्तोत्र ६३:३-८ आणि मार्क १:३२-३९ श्रोत्यांना वाचायला सांगा. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
१५ मि: स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांची वाटप मोहीम—मार्च १७! प्रश्न व उत्तरे. आमंत्रण पत्रिका उपलब्ध असल्यास पत्रिकेची एकएक प्रत श्रोत्यांना वाटा आणि पत्रिकेतील मजकुराची चर्चा करा. परिच्छेद २ वर चर्चा करताना, पत्रिका कशी सादर करता येईल त्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. परिच्छेद ३ वर चर्चा करताना, स्थानीय क्षेत्र कसे उरकले जाईल याबद्दल सांगण्यासाठी सेवा पर्यवेक्षकांना विचारा.
गीत ८ आणि प्रार्थना