नमुना सादरीकरण
जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“बरेच लोक पृथ्वीवर एक चांगली परिस्थिती येईल अशी आशा करतात. तुम्हाला काय वाटतं ही आशा कशी पूर्ण होईल? [उत्तरासाठी थांबा.] या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बायबलमधून एक वचन वाचलं तर तुम्हाला आवडेल का?” जर घरमालकाने आस्था दाखवली तर दानीएल २:४४ हे वचन वाचा. मग जानेवारी – मार्च टेहळणी बुरूज अंक घरमालकाच्या हातात द्या आणि पृष्ठ १२ वरील पहिल्या पोटमथळ्याखाली दिलेली माहिती वाचा आणि त्यावर चर्चा करा. घरमालकाला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी जानेवारी - मार्च
“आपल्यापैकी बऱ्याच जणांना उदरनिर्वाह करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात आणि काही लोकांना तर जीवनावश्यक गोष्टीसुद्धा मिळत नाहीत. कोणीही गरीब नसेल असा काळ येईल असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा. घरमालकाला आवड असल्यास स्तोत्र ९:१८ वाचा.] गरीबी का आली आणि या समस्येवरील तोडग्याविषयी शास्त्र काय सांगतं हे या नियतकालिकात सांगण्यात आलं आहे.”