राज्य गीतांचा आस्वाद घेण्याचा एक उत्तम मार्ग
संगीत ही यहोवाकडून मिळालेली एक उत्तम देणगी आहे असे त्याचे सेवक मानतात. (याको. १:१७) अनेक मंडळ्या सभेच्या आधी व नंतर मंद आवाजात राज्य गीतांचा आस्वाद घेतात. राज्य संगीत वाजवणे हे सभांमध्ये आपले स्वागत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण हे संगीत आपल्या मनाला देवाच्या उपासनेसाठी तयार करते. तसेच आपल्या गीतपुस्तकातील नवीन गाण्यांचे संगीत वाजवल्याने आपण या गीतांच्या चालींशी परिचित होतो व आपल्याला ती गाणी चांगल्या प्रकारे गाण्यास मदत होते. अशा प्रकारचे संगीत सभेनंतर लावल्यामुळे प्रोत्साहनदायक वातावरण टिकून राहते, ज्यात आपण सर्व ख्रिस्ती सहवासाचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे, सभेच्या आधी व नंतर सिंग टू जेहोवा—पियानो अकंपनीमेंट यातून संगीत लावण्याची मंडळीच्या वडील वर्गाने व्यवस्था करावी. संघटनेने बनवलेल्या संगीताव्यतिरिक्त इतर कोणत्याही रेकॉर्डिंग्स लावणे योग्य ठरणार नाही. बंधुभगिनींच्या संभाषणात व्यत्यय येऊ नये म्हणून संगीत फार मोठ्याने वाजवले जाणार नाही याची वडिलांनी काळजी घेतली पाहिजे.