ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२६ डिसेंबर २०११ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल.
१. आपण एखाद्याचे मन दुखावले असेल तर त्याला आणखी चिरडीला आणण्यापासून परावृत्त होण्यास नीतिसूत्रे ३०:३२ मधील सल्ला आपल्याला कशा प्रकारे मदत करतो? [टेहळणी बुरूज८७ १०/१ पृ. २९ परि. ८]
२. हास्यास “वेडे” का म्हटले आहे? (उप. २:१, २) [टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. १३ परि. ६]
३. काही लोकांना वाटते की उपदेशक ३:१-९ या वचनातील शलमोनाचे शब्द नशिबावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात पण, उपदेशक ९:११ मधील शब्द, जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी नशीबावर निर्भर नाहीत हे कसे स्पष्टपणे दाखवून देतात? [टेहळणी बुरूज०९ ७/१ पृ. ४ परि. ४]
४. “फाजील धार्मिक” होण्यात कोणता धोका आहे? (उप. ७:१६) [टेहळणी बुरूज१० १०/१५ पृ. ९ परि. ८-९]
५. जे विवाह करू इच्छितात त्यांनी जोडीदार निवडण्याबाबत उतावीळपणा करणे शहाणपणाचे ठरणार नाही हे गीतरत्न २:७ या वचनातून कसे कळते? [टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. ५ परि. १]
६. शुलेमकरिणीच्या “ओठातून मध स्रवतो” आणि तिच्या “जिव्हेखाली मधु व दुग्ध ही आहेत” याचा काय अर्थ होतो? (गीत. ४:११) [टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. ५ परि. ६]
७. यहोवाने आहाज या दुष्ट राजाचे तारण का केले? (यश. ७:३, ४) [टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि. ४]
८. एफ्राइम ६५ वर्षांच्या आत कशा प्रकारे ‘भंग पावले?’ (यश. ७:८) [टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि.५]
९. येशू ख्रिस्त हा “इशायाच्या बुडख्यापासून [निघालेले] कोंब” आणि त्याचवेळी “इशायाचे मूळ” कसा काय असू शकतो? (यश. ११:१, १०, पं.र.भा.; रोम. १५:१२) [टेहळणी बुरूज०६ १२/१ पृ. १३ परि. ६]
१०. येशूला “दावीदाच्या घराण्याची किल्ली” केव्हा मिळाली आणि तेव्हापासून तो या किल्लीचा कशा प्रकारे वापर करत आहे? (यश. २२:२२) [टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. ३१ परि. २]